कोविडपासून सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे या साधनांनी सामान्यांच्या त्वचेवर खूप परिणाम केला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून सुरक्षेसाठी वापरले जाणारे साधन, अॅलर्जी आणि त्वचेच्या समस्यांबद्दल 'ईटीव्ही भारत सुखीभवने' त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. उमा एस कामत यांच्याशी चर्चा केली. डॉ. उमा या मोरमुगाओ पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) रुग्णालय आणि गोव्यातील एसएमआरसी वास्को रुग्णालयात सल्लागार त्वचा रोग तज्ज्ञ आहेत.
त्वचेसंबंधी समस्या की डर्मेटाइटिस
डॉ. कामत सांगतात की, आपल्या त्वचेच्या वरील थरावर (layer of skin) सूज येण्याची समस्या ही डर्मेटाइटिसच्या श्रेणीत मोडते. जी सामान्यत: दोन प्रकारची समजली जाते, अॅलर्जीशी संबंधित डर्मेटाइटिस किंवा (अॅलर्जिक कान्टॅक्ट डर्मेटाइटिस) आणि उत्तेजन तत्वांनी उत्पन्न डर्मेटाइटिस (इरिटंट कान्टॅक्ट डर्मेटाइटिस).
अॅलर्जिक कान्टॅक्ट डर्मेटाइटिस (एसीडी) - ज्या पदार्थाने तुम्हाला अॅलर्जी होते ती त्वचेत रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करते, तेव्हा अॅलर्जिक कान्टॅक्ट डर्मेटाइटिस होतो. व्यक्तीच्या त्वचेवर अॅलर्जीचा प्रभाव हा अॅलर्जीला कार्यरत करणारी अॅलर्जेनची (Allergen) शक्ती आणि पीडितची अॅलर्जीबाबतची संवेदनशीलता यावर अवलंबून असते. एकदा व्यक्तीला कुण्या वस्तूची अॅलर्जी झाली तर अॅलर्जेनचे थोडे प्रमाण देखील प्रतिक्रियेचे कारण ठरू शकते.
इरिटंट कान्टॅक्ट डर्मेटाइटिस - हा त्वचा रोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा तेव्हा होतो जेव्हा पदार्थ त्वचेच्या बाह्य संरक्षक थराला (outer protective layer) नुकसान पोहचवते.
अॅलर्जीसाठी जबाबदार घटक
डॉ. उमा कामत सांगतात की सामान्यत: लोकांमध्ये काही त्वचेसंबंधी समस्या आणि अॅलर्जी या सर्वसाधारणपणे दिसून येतात. या अॅलर्जी आणि समस्यांना ट्रिगर पुढील प्रमाणे आहेत,
१) हेअर डाई, परफ्यूम, डिओडोरेंट्स, बॉडी वॉश
२) जंतुनाशक स्प्रे
३) मास्क
४) हातमोजे
५) सॅनिटायझर
६) सौंदर्य प्रसाधने
७) सॉल्व्हेंट्स
८) झाडे
९) डिटर्जेंट
१०) दारू
११) शैम्पू
१२) ब्लीचिंग एजंट
१३) खते
मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझरमुळे एसीडी
फेस मास्क : डॉ. कामत सांगतात की, काही विशेष प्रकारच्या मास्कच्या आत स्पंज आणि स्ट्रिपवर पॉलियुरेथेन लावल्या जाते, जे एसीडीचे कारण ठरू शकते. त्याचबरोबर, असे फेस मास्क जे खूप घट्ट असतात आणि कापडाने बनलेले असतात ते चेहऱ्यावर व्रण, जळजळ किंवा अस्वस्थतेचे कारण ठरू शकते. तसेच, काही मास्क हे चेहऱ्याच्या नैसर्गिक ओलाव्याला सोशूष घेतात, त्यामुळे त्वाचा कोरडी होते. ज्यामुळे चहऱ्यावर इसबचे (eczema) लक्षण जसे, लाल किंवा डाग असलेली त्वचा, खाज, कोरड्या त्वचेसह पपडी, जळजळ वाटू शकते.
हातमोजे : हामोज्यांना लावल्या जाणाऱ्या ग्लव पावडरमुळे त्वचेवर जळजळ किंवा ते पपडीदार होत असल्याच्या घटना दिसून येतात.
वारंवार हात धुण्यामुळे, सॅनिटायझर वापरल्याने होते एसीडी :
वारंवार हात धुतल्याने त्वचेवर निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे त्वचेची पारगम्यता आणि संवेदनशीलता वाढते. साबनाच्या वारंवार उपयोगामुळे जंतूंचे नाश होते, मात्र त्वचेच्या प्राकृतिक तेलाला हटवते. यामुळे त्वचेसंबंधी विविध समस्या दिसून येऊ शकते. कोरोनापासून सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरमुळे देखील त्वचेत कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.
सर्वात जास्त संवेदनशील कोण?
जे लोकं नियमितपणे जास्त प्रमाणात रसायणे असलेली वस्तू किंवा उत्पादने वापरतात, तसेच कामानिमित्त ज्या लोकांना धूळ आणि प्रदूषण असलेल्या ठिकाणी जास्त राहावे लागते, अशांना त्वचेसंबंधी समस्या होण्याची शक्यता जास्त असल्याचे डॉ. उषा यांनी सांगितले.
या समस्येने सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या लोकांची यादी खालीलप्रमाणे आहे,
१) हेयर ड्रेसर, ब्युटीशियन
२) बांधकाम मजूर
३) धातू कामगार
४) आरोग्य सेवा कर्मचारी
५) माळी
६) शेतमजूर
वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
१) खाज सुटणे, अचानक पुरळ दिसून येणे (लाल चकत्ते).
२) दाणे शरीराच्या अन्य भागांत पसरणे.
३) आठवडे उलटूनही पुरळमध्ये सुधार न होणे.
४) त्वचा संसर्गित दिसून येते - पू (मवाद) बाहेर येते.
५) ताप येणे.
सावधगिरी
डॉ. उमा कामत सांगतात की, समस्येच्या निदानासाठी त्याच्या कारणांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे, तुमच्या त्वचेला प्रभावित करणाऱ्या अॅलर्जेनची माहिती तुम्हाला असली पाहिजे. याव्यतिरिक्त विविध प्रकारच्या अॅलर्जी आणि त्वचेसंबंधी समस्यांपासून बचाव करण्यासाठी पुढील उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
१) सौम्य साबण आणि पाण्याने त्वचा धुवा
२) कूल कंप्रेस हे सूज आणि खाजेला नियंत्रित करण्यास मदत करते. खारा किंवा बुरोच्या द्रावणात (अॅल्युमिनियम अॅसीटेटचे द्रावण) प्रभावित त्वचेला भिजवल्यास तुम्हाला आराम मिळू शकते.
३) त्वचेत आधीच सूज आणि जळजळ होत असल्याने डेटॉल आणि सेवलॉन आदीचा वापर करू नये.
४) हाइपोएलर्जेनिक, सुगंधरहित मॉइश्चरायझर त्वचेच्या सर्वात बाह्य थराला पुनर्संचयित करते आणि खाजेपासून आराम देते.
मास्क व हातमोजांसंबंधी सावधगिरी
१) सौम्य क्लीन्झरचा वापर करा, त्वचेला कोरडे करा आणि नंतर मास्क घालण्याअगोदर आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.
२) शक्य असेल तेव्हा मास्क घालण्यापासून विश्रांती घ्या.
३) आपल्या कापडी मास्कला वारंवार धुवावे. मास्कचा उपयोग झाल्यानंतर त्यास धुतले पाहिजे, असा सल्ला रोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) दिला आहे.