ETV Bharat / sukhibhava

विवाहांतर्गत बलात्कार : स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो ? - Marital Rape

भारतात जास्तीत जास्त महिला छळ आणि अत्याचार त्यांच्या आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकार करतात. कारण ते भेदभावपूर्ण वातावरणात वाढलेले असतात. या अत्याचारांमुळे स्त्रीच्या मनावर सखोल परिणाम होतो. औदासिन्य, अस्वस्थता, वेडेपणा अशा मानसिक आजारांना काही स्त्रियांना तोंड द्यावे लागते.

Marital Rape
विवाहांतर्गत बलात्कार
author img

By

Published : Sep 14, 2020, 12:37 PM IST

हे २०२० साल सुरू आहे आणि भारतात अजूनही विवाहांतर्गत बलात्कार बेकायदेशीर नाही. लग्नानंतर पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा समजला जात नाही, त्यामागे अनेक सामाजिक कारणे आहेत. महत्त्वाचे कारण म्हणजे, लग्नानंतर पतीने पत्नीकडून लैंगिक सुखाची अपेक्षा ठेवणे आणि त्यासाठी तिला जबरदस्ती करणे, हे सर्वसामान्य समजले जाते.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वीणा कृष्णन म्हणतात की आपल्या समाजात शारिरीक जवळीक आणि इच्छा मुख्यतः पुरुषांशी संबंधित असतात. त्यामुळेच ते मोठे होताना हेच गृहित धरतात की लैंगिक सुखावर त्यांचा अधिकारच आहे. तेही कुठल्याही किमतीत. त्यांचे लग्न झाल्यावरही अनेकदा शारीरिक संबंध हे दोघांनी मिळून ठेवायचे असतात, यावर त्यांचा विश्वास नसतो आणि ते आपल्या पत्नीच्या शारीरिक संबंधांबद्दलच्या इच्छेचा आदरही करत नाही.

भारतात जास्तीत जास्त महिला छळ आणि अत्याचार त्यांच्या आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकार करतात. कारण ते भेदभावपूर्ण वातावरणात वाढलेले असतात. या अत्याचारांमुळे स्त्रीच्या मनावर सखोल परिणाम होतो. औदासिन्य, अस्वस्थता, वेडेपणा अशा मानसिक आजारांना काही स्त्रियांना तोंड द्यावे लागते.

विवाहांतर्गत बलात्कारामागची कारणे

डॉ. वीणा कृष्णन सांगतात की बऱ्याचदा पतीचा अहंकार दुखावला गेला की आपल्या पत्नीवर श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पती पत्नीवर अत्याचार करतो. जेव्हा पुरुषाला आपला अहंकार दुखावला गेला असे वाटल्यावर तो पत्नीवर शिक्षा म्हणून लैंगिक अत्याचार करून आपण किती सामर्थ्यवान आहोत हे दाखवतो.

डॉक्टर असेही म्हणतात की वारंवार अत्याचार आणि छळ सहन केल्यानंतर स्त्रीची सेक्स करण्याची इच्छाच कमी होते आणि ती तिच्या पतीपासून मनाने दूर जाते. ती पतीसोबत जवळीक करायला तयार होत नाही. त्यामुळे कदाचित पुन्हा एकदा तिला बलात्कार आणि छळाला तोंड द्यावे लागते.

डॉ. कृष्णन म्हणतात, फक्त शारीरिक शक्ती दाखवून संपत नाही, तर विवाहांतर्गत बलात्काराचे परिणाम खूप खोलवर होतात. पती आपल्या पत्नीला दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करतो, तीव्र परिणामांची धमकी देतो आणि अनेक प्रकारे तिला त्रास होईल असा वागू शकतो. याचा परिणाम ती मनातून उन्मळून पडते. पुन्हा एकदा पुरुषाला नातेसंबंधात आपण सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहोत, असे वाटायला लागते.

बलात्कार करणारा पती मानसिक आजारी असतो

डॉ. वीणा कृष्णन सांगतात, जे पती सामान्यतः आपल्या पत्नीवर बलात्कार करतात, ते वैवाहिक जीवनात सर्वात शक्तिशाली असतात. म्हणून, त्यांना मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त मानले जाऊ शकत नाही. अशा विवाहांतर्गत बलात्कारात पती असुरक्षित असतो आणि त्याचा आत्मसन्मान कमी असतो. त्यांनी असेही सांगितले की, जेव्हा पतीला पत्नी लैंगिक सुख नाकारते तेव्हा त्याला ते आपले अपयश वाटते. आणि तो स्त्रीवर आणखी अत्याचार करायला लागतो. अशा प्रकारची मानसिकता ही आजारी मानली जाते. अनेक पुरुष मोठे होत असताना आजूबाजूच्या स्त्रियांना देण्यात येणारा त्रास पाहत असतात. त्यामुळेही त्यांची मानसिकता अशी घडली जाते.

याचा परिणाम स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर होतो

डॉ. वीणा कृष्णन म्हणतात, अनेक काळ बलात्कार आणि छळ सहन केल्याने स्त्रीच्या मनावर, भावनांवर ओरखडे पडतात. ती आतून प्रचंड दुखावली जाते. त्यामुळे स्त्रियांमध्ये औदासिन्य, अस्वस्थता, वेडेपणा, आत्मसन्मान हरवून जाणे आणि आत्मविश्वास ढासळणे हे विकार बळावतात. याचा परिणाम निद्रानाश, हार्मोनल असंतुलन अशा शारीरिक आजारांत होतो. विवाहांतर्गत बलात्काराला शिक्षा मिळत नसल्याने जोडप्याने ताबडतोब तज्ज्ञांची मदत घ्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.