ETV Bharat / sukhibhava

Health benefits of hinga : कान, दातदुखी, पचन किंवा गॅस संबंधित समस्यांपासून 'हिंग' देते आराम...

आयुर्वेदात हिंगाचे पाणी अनेक समस्यांवर फायदेशीर मानले जाते. कानदुखी, दात किडणे आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही हिंगाचे पाणी फायदेशीर आहे.

Health benefits of hinga
हिंग
author img

By

Published : May 24, 2023, 12:06 PM IST

हैदराबाद : आयुर्वेदानुसार कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून प्यायल्याने पचन किंवा गॅसशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. म्हणूनच मुलांच्या नाभीमध्ये हिंगाचे पाणी टाकले जाते, जेणेकरून मुले जे दूध पितात ते सहज पचते आणि पोटदुखीची तक्रार होत नाही. हिंगामध्ये पाचक उत्तेजक घटक असतात. ते घटक लाळ आणि लाळ अमायलेस सारख्या एंजाइम सक्रिय करतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मसूर किंवा भाज्यांमध्ये चिमूटभर हिंग वापरतात.

वजन कमी करण्यासाठी हिंग फायदेशीर आहे : हिंगामध्ये चयापचयदृष्ट्या सक्रिय घटक असतात. चयापचय वाढवण्यासाठी कोमट पाण्यात हिंग मिसळून प्या. याशिवाय हिंगामध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत. हिंगाच्या पाण्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते., त्यामुळे वजन सहजरित्या नियंत्रित होते.

कानदुखी आणि दात किडण्यापासून मिळतो आराम : हिंगामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-इन्फेक्शन गुणधर्म आहेत, जे कानदुखीपासून आराम देतात. यासाठी दोन चमचे खोबरेल तेलात चिमूटभर हिंग घालून मंद आचेवर गरम करा. गरम झाल्यावर त्याचे काही थेंब कानात टाका, वेदना कमी होतील. दात किडत असल्यास किंवा दुखत असल्यास हिरड्याभोवती चिमूटभर हिंग लावा. हा उपाय दिवसातून २ ते ३ वेळा केल्याने वेदना कमी होतात.

डोकेदुखी आणि मायग्रेनपासून व्हा मुक्त : डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असल्यास एक ते दोन कप पाणी मंद आचेवर गरम करा. आता त्यात चिमूटभर हिंग टाका. 10-15 मिनिटे गरम होऊ द्या. पाणी कमी झाले की गॅस बंद करा. हे पाणी दिवसातून ३ ते ४ वेळा प्या. गुलाब पाण्यात हिंग मिसळून पेस्ट बनवून कपाळावर लावल्यानेही वेदना कमी होतात.

मासिक पाळीच्या असह्य वेदना होत असताना प्या हिंगाचे पाणी : हिंग डिसमेनोरिया, म्हणजे मासिक पाळीच्या तीव्र वेदनांवर प्रभावी आहे. मासिक पाळीच्या तीव्र वेदनांमध्ये हिंगाचे पाणी प्या, आराम मिळेल. हिंगाचा चहा पिल्यास पोट फुगण्याची समस्या दूर होते. एक कप गरम पाणी, आले पावडर, खडे मीठ आणि चिमूटभर हिंग मिसळून हा चहा बनवा. यामुळे वेदनाही दूर होतील. याशिवाय हिंगात कॅन्सरविरोधी गुणधर्मही असतात. त्याच्या मदतीने पोटाचा कर्करोग टाळता येतो. हिंगामध्ये अँटी-केमो एजंट देखील आढळतात, जे कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात.

हेही वाचा :

  1. Sabja Seeds Health Benefits : सब्जाच्या बिया पोटाला थंडावा देऊन पचनक्रिया निरोगी ठेवतात, जाणून घ्या त्याचे फायदेहेही वाचा :
  2. Health Benefits Fits Of Mango Fruit : फळांचा राजाचे फायदे माहित आहेत का ? लठ्ठपणा आटोक्यात आणू शकतो आंबा...
  3. Lemon in Summer Season : लिंबाचा रस म्हणजे उन्हाळ्याचे अमृत! प्यायले तर 'हे' फायदे होतात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.