हैदराबाद : भारताचे प्रवेशद्वार म्हणून गेट वे ऑफ इंडियाचा उल्लेख करण्यात येतो. मात्र गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास मोठा रंजक आहे. गेट वे ऑफ इंडिया हा ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज आणि महाराणीच्या स्वागतासाठी बांधण्यात आला होता. भारताच्या दक्षिण तटावरील अपोलो बंदरात गेट वे ऑफ इंडियाची पायाभरणी 31 मार्च 1911 मध्ये करण्यात आली. मात्र गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम 1924 मध्ये पूर्ण होऊन 4 डिसेंबर 1924 ला गेट वे ऑफ इंडियाचे उद्घाटन करण्यात आले.
गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास : ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज आणि महाराणी हे डिसेंबर 1911 मध्ये भारताच्या भेटीवर येणार होते. त्यांच्या स्वागताच्या आठवणीत मुंबईच्या दक्षिण तटावर गेट वे ऑफ इंडिया ही जगप्रसिद्ध वास्तू बांधण्याचे ठरवण्यात आले होते. गेट वे ऑफ इंडियाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात 1913 मध्ये करण्यात आली होती. याची डिझाईन वास्तुविशारद जॉर्ज विटेटने 1914 स्विकारली होती. मात्र गेट वे ऑफ इंडियाचे प्रत्यक्ष काम 1924 मध्ये पूर्ण करण्यात आले. या दरम्यान डिसेंबर 1911 मध्ये ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज आणि महाराणी हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांना गेट वे ऑफ इंडियाच्या कार्डबोर्डची कॉपी भेट देण्यात आली होती.
कसे आहे बांधकाम : भारताच्या भेटीवर यायचे असल्यास परदेशी नागरिकांना मुंबईतील अपोलो बंदरात यावे लागायचे. नाहीतर भारताच्या एकदम खाली असलेल्या कालिकत बंदराकडे जावे लागायचे. मात्र ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज आणि महाराणी यांच्या स्वागतासाठी भारताच्या दक्षिण तटावर असलेल्या मुंबईतील अपोलो बंदरात गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू उभारण्याचे ठरवण्यात आले. ही वास्तू 16 व्या शतकातील गुजराती वास्तुकलेचा नमुना आहे. इंडो सारासेनिक पद्धतीने या वास्तुला बेसाल्ट खडकाने बांधण्यात आले होते. 1924 मध्ये या वास्तुचे बांधकाम पूर्ण झाले असून गेट वे ऑफ इंडियाची 26 मिटर अर्थात 85 फूट उंची आहे. गेट वे ऑफ इंडिया हे विजयाचे प्रतिक असल्याची ब्रिटीशांची भावना होती. ब्रिटीश गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचा ताजमहाल असेही संबोधत होते.
बांधकामाला आला इतका खर्च : राजा पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामावर ब्रिटीशांनी चांगलेच लक्ष केंद्रीत केले होते. 1913 मध्ये गेट वे ऑफ इंडियाच्या बांधकामावर तब्बल 21 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम करणाऱ्या गैमन इंडिया या वास्तूकलेचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम केले होते.
हेही वाचा - Increase Obesity Risk In Children : गरोदर मातेला कोरोनाची लागण झाल्यास मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणाचा धोका