ETV Bharat / sukhibhava

People With Chronic Pain : तीव्र वेदना असलेल्या नागरिकांच्या मानसिक आरोग्यासाठी लवचिकता आहे आवश्यक, संशोधकांनी केला हा दावा - प्राध्यापक जोआन डिक्सन

जगभरातील २० टक्के नागरिकांना तिव्र वेदनेचा त्रास होतो. मात्र त्यांच्या या वेदनेमुळे त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत अडथळा येत असल्याने त्याचा परिणाम या व्यक्तिच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे.

People With Chronic Pain
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 5, 2023, 4:01 PM IST

पर्थ : जगभरातील २० टक्के नागरिकांच्या शरीरात तिव्र वेदना होतात. मात्र या वेदनेचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनपद्धतीसह मानसिक आरोग्यावर तिव्र परिणाम होण्याची शक्यता असते. ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान युनिव्हर्सिटी (ECU) च्या संशोधनात तीव्र वेदना एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या वेदना व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

जीवनपद्धतीवर वेदनेचे गंभीर परिणाम : व्यक्तीला असलेल्या तिव्र वेदनेमुळे त्यांची जीवनपद्धतीवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. याबाबत एडिथ कोवान युनिव्हर्सिटीच्या संशोधक तारा स्विंडेल्स आणि प्राध्यापक जोआन डिक्सन यांनी 300 पेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण केले आहेत. या सर्वेक्षणात कर्करोगाशी संबंधित नसलेल्या मात्र तीव्र वेदना असलेल्या नागरिकांचा समावेश होता. यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांच्या वेदनेची तीव्रता मानसिक आरोग्यावर किती परिणाम करते, याविषयी मत व्यक्त केले. त्यासह त्यांच्या दैनंदिन व्यवहारात वेदनेमुळे किती त्रास सहन करावा लागतो या प्रश्नांचीही उत्तरे दिल्याचे या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मानसिक आरोग्यावर परिणाम : प्राध्यापक डिक्सन यांनी केलेल्या संशोधनात नागरिकांना त्यांच्या वेदनेमुळे आपले उद्दिष्ट साध्य करण्यात अडथळा येत असल्याचे आपल्या संशोधनात नमूद केले आहे. त्यासह रोजची दैनंदिन कार्य करणेही त्यांच्या वेदनेमुळे शक्य होत नाही. काम करण्याची त्यांची मानसिकता नसल्याचेच त्यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केले आहे. या संशोधनाने वैयक्तिक उद्दिष्टाची लवचिकता दर्शविल्याचा दावा संशोधक तारा स्विंडेल्स यांनी केला आहे. आपण आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी कसे प्रयत्न करतो, हे मानसिक आरोग्य ठरवते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेदनेच्या तिव्रतेपेक्षाही वेदनेचा अडथळा जास्त मानसिक कत्रास देतो, असेही त्यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Laser Treatments Prevent Skin Cancer : त्वचेचा कर्करोग टाळण्यास लेझर उपचाराची होते मदत : अभ्यासातून झाले स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.