ETV Bharat / sukhibhava

Eyelash Growing Tips : तुम्हालाही आवडतात का लांब पापण्या? जाणून घ्या काही टिप्स... - you also like long eyelashes

Eyelash Growing Tips : ऑलिव्ह ऑइलमध्ये फिनोलिक संयुगे भरपूर प्रमाणात असतात. याच्या मदतीने पापण्या लांब आणि जाड करता येतात. झोपण्यापूर्वी पापण्यांवर ऑलिव्ह ऑईल लावू शकता.

Eyelash Growing Tips
लांब पापण्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 5:36 PM IST

हैदराबाद Eyelash Growing Tips : प्रत्येक स्त्रीला लांब आणि जाड पापण्या असाव्यात असं वाटत असतं. लांब आणि चमकणाऱ्या पापण्या तुमच्या चेहऱ्याला एक वेगळंच आकर्षण देतात. यामुळेच आजकाल स्त्रिया लग्न किंवा मोठ्या समारंभाला जाण्यापूर्वी डोळे अधिक आकर्षक बनवण्यासाठी बनावट पापण्यांचा अवलंब करत आहेत. आजकाल अनेक कृत्रिम उपचार आहेत. ज्याद्वारे पापण्या लांब आणि जाड केल्या जातात. मात्र हे सर्व प्रकारचे उपचार फार काळ टिकत नाहीत, तसंच काहीवेळा त्यांचे डोळ्यांवर दुष्परिणामही झालेले दिसून आले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमच्या पापण्या जाड आणि लांब करायच्या असतील, तर या लेखात आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. या पद्धतींच्या मदतीने तुम्ही तुमचे लांब पापण्यांचे स्वप्न कोणत्याही दुष्परिणामांशिवाय अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल.

ग्रीन टी चमत्कार करेल : स्टाइलक्रेसच्या मते ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतं, जे केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतं. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी थंड करून बोटांनं पापण्यांवर लावा. असं नियमित केल्यानं तुमच्या पापण्या काही वेळातच लांब आणि जाड होतील. याशिवाय तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता. याच्या मदतीनं पापण्यांसोबतच तुमच्या डोक्याचे केस वाढवण्यासाठी ते प्रभावी ठरेल.

एरंडेल तेल उपयुक्त : पापण्यांच्या वाढीसाठी एरंडेल तेल हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ऍसिड असतं. त्यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. हे पापण्यांच्या फोलिकल्सचे पोषण करण्याचे काम करतात. याशिवाय व्हिटॅमिन ई, ओमेगा-6 फॅटी ऍसिड सारखे इतर अनेक पोषक घटक देखील एरंडेल तेलात भरपूर प्रमाणात आढळतात. ते पापण्यांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. यासाठी तुम्ही कापसावर थोडंसं एरंडेल तेल घेऊ शकता किंवा बोटांच्या मदतीने डोळ्यांना लावू शकता.

ऑलिव्ह तेल देखील प्रभावी : ऑलिव्ह ऑइलमध्ये फिनोलिक संयुगे भरपूर प्रमाणात असतात. याच्या मदतीने पापण्या लांब आणि जाड करता येतात. झोपण्यापूर्वी पापण्यांवर ऑलिव्ह ऑईल लावू शकता. काही दिवसातच तुम्हाला त्याचा अप्रतिम प्रभाव दिसेल.

कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई : एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई तेल मिसळल्याने तुमच्या पापण्यांचे केस दाट होतील. एलोवेरा जेल तुमच्या पापण्यांना मऊ करते, तर व्हिटॅमिन ई केस गळण्याची समस्या टाळण्याचे काम करते. अशा स्थितीत पापण्यांच्या वाढीसाठी हे दोन्ही गुणकारी मानले जातात.

खोबरेल तेल : खोबरेल तेलामध्ये लॉरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात आढळतं. ते पापण्यांचे पोषण करण्याचे काम करते. याव्यतिरिक्त नारळाच्या तेलामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे पापण्यांचे तुटणे टाळू शकतात तसंच निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तुम्ही कापसाच्या बोळ्यानं पापण्यांवर तेल लावू शकता. तेल रात्रभर राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या पापण्याही लांब आणि जाड होतील.

हेही वाचा :

  1. World Samosa Day 2023 : जागतिक समोसा दिवस 2023; जाणून घ्या भारतात कधी आणि कुठून आला समोसा...
  2. Benefits of Capsicum : सिमला मिरची आहे आरोग्याचा खजिना; जाणून घ्या काय आहेत आरोग्यदायी फायदे...
  3. Health Benefits of Guava : पावसाळ्यात पेरू खाणे आहे आरोग्यदायक; जाणून घ्या काय आहेत फायदे....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.