ETV Bharat / sukhibhava

H3N2 Virus : या नागरिकांना एच३ एन२ विषाणूचा धोका असतो जास्त - एच३ एन२ विषाणूचा धोका

एच३ एन२ विषाणूमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. मात्र हा आजार कशामुळे होतो, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे या आजाराबाबत काळजी घेणे महत्वाचे ठरते.

H3N2 Virus
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 17, 2023, 11:45 AM IST

नवी दिल्ली : देशात सध्या खोकला, अंगदुखी, ताप आणि घसादुखी आदी श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाली आहे. परंतु हा एच३ एन२ विषाणूमुळे होणारा इन्फ्लूएन्झा असू शकतो. हा इन्फ्लूएन्झा नेमका कशामुळे होतो, याची कारणे अद्यापही स्पष्ट झाली नाहीत. तरी हा आजार कोरोना, ओमिक्रॉनचा उपप्रकार XBB मुळे होत असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

विषाणूंच्या संयोगातून बनला एच३ एन२ आजार : एच३ एन२ इन्फ्लूएन्झाची प्रकरणे देशात झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे हा आजार नेमका कशामुळे होतो, याबाबतची वेगवेगळी माहिती वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. मात्र याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ( ICMR ) आकडेवारीनुसार कोरोना विषाणू, स्वाइन फ्लू (H1N1), H3N2 आणि इन्फ्लूएंझा बी व्हायरसपासून विषाणूंच्या संयोजनातून एच३ एन२ हा आजार निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे गरजेचे आहे.

काय आहेत एच३ एन२ आजाराची लक्षणे : एच३ एन२ इन्फ्लूएन्झा आणि H13N1 हे दोन्ही प्रकारचे इन्फ्लुएंझा ए विषाणू आहेत. ते फ्लू म्हणून ओळखले जातात. काही सामान्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ ताप, खोकला, नाक वाहणे आणि अंगदुखी यांचा समावेश होतो. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये लोकांना धाप लागणे, घरघर होणे आदी लक्षणे दिसून येतात. याशिवाय कोविडचे प्रमाणही वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नवीन आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार चार महिन्यांनंतर एका दिवसात 700 हून अधिक कोविड -19 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात आता एकूण सक्रिय रुग्ण 4 हजार 623 वर पोहोचले आहेत.

एच३ एन२ आजाराचे निदान करणे आहे कठीण : एच३ एन२ आजार नेमका कशाने होतो, याबाबतचे निदान करणे कठीण आहे. नाकातून घेण्यात आलेल्या स्वॅबच्या माध्यमातूनच या आजाराचे निदान करता येऊ शकते. त्यातही कोरोना आणि एच३ एन२ या आजाराचेही निदान करणे कठीण असल्याचे मत सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ सम्राट शाह यांनी एआयएनएस या वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले. कोरोनाची लक्षणे 2 ते 3 दिवस टिकतात आणि रुग्ण कोणत्याही त्रासाशिवाय बरे होतात. मात्र जेव्हा H3N2 आणि H3N1 आजार होतो, तेव्हा ओल्या खोकल्याचा धोका जास्त असतो. तो काही आठवडे टिकतो, त्यामुळे न्यूमोनिया किंवा दुय्यम बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचेही डॉ शाह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

या लोकांना जास्त धोका असतो : एच 3एन 2 या आजारामुळे बाधित रुग्णांच्या घशात कर्कशपणा येतो. तो दोन ते तीन आठवडे टिकतो. कोरोनाची लागण झालेल्या लोकांना सामान्यतः नाक चोंदलेले असते आणि ताप तीन ते चार दिवस टिकतो. मात्र एच ३ एन १ इन्फ्लूएंझा प्राणघातक नाही. परंतु विषाणूची लागण झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यूचा धोका जास्त असण्याची शक्यता आहे. लहान मुले, अर्भक, प्रौढ, गरोदर महिला आदींना या आजाराचा धोका जास्त असल्याचे मत माहीम येथील रहेजा रुग्णालयाचे सल्लागार डॉ. संजीथ ससीधरन यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Solar Geoengineering : सौर भू-अभियांत्रिकी म्हणजे काय आणि ते मानवतेसाठी कसे धोकादायक आहे ते जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.