हैदराबाद : थंडीच्या मोसमात लोकांना अनेकदा वेगळ्या प्रकारचा थकवा किंवा आळस जाणवतो. थंडीचा कडाका वाढत असल्यानं लोकांना दैनंदिन कामं करताना आणि घोंगडी किंवा रजईतून बाहेर पडताना शारीरिक त्रास होतो. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात लोकांना स्वाभाविकपणे ऊर्जेची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं हिवाळ्यात सेवन केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. विशेष म्हणजे यामुळे लाभणाऱ्या तरतरीमुळे दिवसही चांगला जाईल. शिवाय आरोग्य उत्तम राहील, ते वेगळं.
हिवाळ्यात या गोष्टी खाल्ल्यानं ऊर्जा मिळते : आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या खाल्ल्यानं हिवाळ्यात त्वरित ऊर्जा मिळते. या सर्व गोष्टी हिवाळ्यात तुमची एनर्जी वाढवण्याचं काम करतात.
- ड्रायफ्रूट्स : हिवाळ्यात सुका मेवा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि शरीराला ऊर्जेची गरज असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटस् खाऊ शकता. बदाम, अक्रोड आणि पिस्ता साधारणपणे सर्व घरांमध्ये सहज उपलब्ध असतात. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि प्रथिनं असतात.
- खजूर मिल्कशेक : खजूरमध्ये जीवनसत्त्वे, ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रक्टोजसारखी नैसर्गिक शर्करा असते. जे तुम्हाला ऊर्जा आणि शक्ती देते.
- हंगामी फळे : हिवाळ्यात हिरव्या भाज्यांसोबतच अशी अनेक फळे असतात ज्यांचा आहारात संत्रे, स्ट्रॉबेरी, सपोटा, पेरू, द्राक्षे यांचा समावेश नक्कीच करावा.
- अंडी : हिवाळ्यात रोज एक अंडे खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रथिनांसह, अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी 3 देखील असते जे आपल्याला लगेच ऊर्जा देऊ शकते.
- रताळे : रताळे हे पोषक तत्वांनी युक्त अन्न आहे. 100 ग्रॅम रताळ्यामध्ये 90 कॅलरीज आणि 24 ग्रॅम निरोगी कर्बोदके असतात. अशा परिस्थितीत हिवाळ्यात हे खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते.
- मेथी-पाक : मेथी-पाक खाणे हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरते. मेथीचे दाणे, मैदा, नट आणि काही मसाल्यांनी बनवलेला हा गोड पदार्थ आहे. यामुळे तुमच्या शरीराला उष्णता तर मिळतेच शिवाय त्वरित ऊर्जाही मिळते.
हेही वाचा :