हैदराबाद : काजू खाल्याने वजन वाढते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. योग्य प्रमाणात काजू खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. काजू हे असे ड्रायफ्रूट आहे जे प्रत्येकाला आवडते. काही लोक भाजीच्या प्यूरीमध्ये देखिल काजूचा वापर करतात. मिठाईमध्ये देखिल काजूचा वापर केला जातो. काजूमध्ये प्रोटीन, मिनरल्स, हेल्दी फॅट्स असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. रोज काजू खाल्याने पचनक्रिया सुधारते. जर काजू योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन वाढत नाही.
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : काजू खाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कमी प्रमाणात काजू खाल्याने शरीरातील एलडीएलची पातळी कमी होते. काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.
- वजन कमी करण्यास होते मदत : काजूमध्ये जास्त प्रमाणात विटामिन आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. या पोषक घटकांमुळे शरीराला एनर्जी मिळते. यात असलेल्या मॅग्नेशियममुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काजूचा समावेश केला तर दिवसभरात तुम्हाला जास्त भूक लागणार नाही, कारण काजू शरीरातील ऐपेटाइटला नियंत्रित ठेवतो. अशाने तुमचे वजन देखिल वाढणार नाही.
- पचनासाठी आहे फायदेशीर : काजू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, कारण त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचय वाढते, ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहते.
- हाडे मजबूत होण्यास मदत : काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असल्याने ते हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम पर्याय ठरते. त्यामुळे कमकुवत हाडे दिखिल मजबूत होण्यस मदत होते.
- केस मजबूत होतील : आजकालचे तरूण तरूणी केसांच्याबाबतीत जास्तच पजेसिव्ह होताना दिसतात. अनेकांना केसाच्या समस्या असतात. जर तुम्ही काजू खाण्यास सुरुवात केली, तर तुमते केस मऊ, घट्ट, मजबूत आणि चमकदार होतील.
हेही वाचा :