ETV Bharat / sukhibhava

रेनबो डाईटमुळे आरोग्य चांगलं राहू शकतं, काय आहे ही डाईट? वाचा...

जरी आर्थिक समस्येमुळे किंवा वेळेच्या कमतरतेसहित विविध कारणांमुळे सामान्य थाळीमध्ये खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी होऊ लागले असले, तरी आजही आपले वडीलधारी व्यक्तींचा असा समज आहे की, जेवणाची थाळी ही तेव्हाच पूर्ण समजली जाते जेव्हा त्यात विविध रंगांचे आणि निसर्गाचे खाद्य संतुलित प्रमाणात असते. या बाबीची पुष्टी आता आहार तज्ज्ञच नव्हे, तर राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य संगठणे देखील करत आहेत. आयुष्यभर स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी रेनबो डाइट घ्यावे, असे त्यांचे मत आहे.

author img

By

Published : Jul 22, 2021, 10:59 PM IST

EAT RAINBOW DIET FOR HEALTHY YOU
EAT RAINBOW DIET FOR HEALTHY YOU

लोकांना फळे आणि भाज्यांचे जास्त प्रमाणात सेवन आणि उत्पादन यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने, तसेच फळे आणि भाजीपाला खाण्याचे आरोग्य आणि आर्थिक फायद्यांना मान्यता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संस्थेने (एफएओ) 2021 हे वर्ष एक विशेष वर्ष म्हणून नियुक्त केले आहे. त्याअंतर्गत लोकांना रेनबो आहार घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. रेनबो आहारामध्ये (diet) प्रत्येक रंगाच्या भाज्यांचा समावेश आहे.

रेनबो आहाराचे आरोग्य आणि आर्थिक फायदे

रेनबो आहाराचे फायदे पुढील प्रमाणे आहे,

योग्य प्रमाणात ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने मुलांचा संपूर्ण शारीरिक आणि मानसिक विकास होतो, तसेच त्यांच्यात उत्तम रोगप्रतिकारक शक्तीचा विकास होतो. मुलांचे आयुष्यही मोठे होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग सारख्या संसर्गजन्य नसलेल्या (गैर संचारी) रोगांना रोखण्यास मदत करू शकते.

जागतिक स्तरावर फळे आणि भाज्यांचा वापराची स्थिती

सरासरी, आपण भारतीय शिफारस केलेल्या किमान प्रमाणात फळे आणि भाज्यांचा जवळपास फक्त दोन-तृतीयांश भागच खातो. तेच उप-सहारा आफ्रिकेमध्ये ही पातळी खूप घटते. आकड्यांनुसार दक्षिण आफ्रिकेत 50 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास 70 टक्के नागरिक फळे आणि भाज्यांचे पर्याप्त प्रमाणात सेवन करण्यात अपयशी होतात.

वेगवेगळ्या रंगाच्या अन्नाचे फायदे

एफएओ (2003) नुसार, फळे आणि भाज्यांचे रंग हे त्यांच्यातील पोषक तत्व आणि फाइटोकेमिकल्सशी संबंधित असतात. जसे,

- जांभळ्या आणि निळ्या रंगांची फळे आणि भाज्या उदाहरण, बीटरूट, लाल पत्ता गोभी, वांगे या भाज्या, तसेच ब्लॅकबेरी, ब्ल्यूबेरी, जांभूळ आणि जांभळ्या रंगाचे अंगूर या फळांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जी कॅन्सर, स्ट्रोक आणि हृदय विकाराचा धोका कमी करतात.

- आहारात लाल रंगाची फळे आणि भाज्या जसे लाल शिमला मिर्ची, लाल मिर्ची आणि टमाटर सारख्या लाल भाज्या आणि सफरचंद, चेरी, लाल अमरूद, स्ट्रॉबेरी, लीची आणि तरबूज सारखी फळे ही कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करू शकतात. यामुळे हृदयाचेही आरोग्य सुधारते.

- थाळीमध्ये नारंगी आणि पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्या जसे, नारंगी, गाजर, कद्दू, लौकी, खुबानी, संतरा, आडू, आंबे, नींबू, पपई, कस्तुरी तरबूज, अननस यात कॅरोटीनोइड असतात जे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

- तपकिरी आणि पांढऱ्या रंगांची फळे आणि भाज्या जसे, फूलगोभी, पांढरा मुळा, लसून, अदरक, रतालू, आलू, कोलोकेशिया आणि केळी, फणस, पांढरा आडू आणि तपकिरी नाशपाती सारखी फळे ही फायटोकेमिकल्सनी भरलेली असतात, ज्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ही फळे आणि भाज्या पोटॅशियमचा समृद्ध स्रोत असतात.

- हिरव्या भाज्या आणि फळे जसे, पालक, भिंडी, मेथी, बथुआ किंवा जंगली पालक, मोहरीची पाने, अमरनाथची पाने, कारले, लेट्यूस, हिरवा सफरचंद, अवोकॅडो, अंगूर, किवी फळ, गोड चूना हे केस, त्वचा आणि डोळ्यांसाठी सर्व सूपरफूड म्हणून ओळखले जातात. या भाज्या आणि फळांमध्ये असलेले फायटोकेमिकल्स कर्करोगाशी लढायला मदत करतात.

- इंद्रधनुष्य रंगाची फळे आणि भाज्या विटामिन, पौष्टिक अँटिऑक्सिडेंट्स आणि कमी कॅलरीने समृद्ध असतात. ही फळे आणि भाज्या हृदयाच्या समस्या, दृष्टी, उच्च रक्तचाप आणि इतर आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत करू शकतात. म्हणून निरोगी राहण्यासाठी, दररोज यापैकी कोणतेही एक फळ, भाजीला आपल्या जेवणाच्या थाळीमध्ये स्थान द्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.