ETV Bharat / sukhibhava

Easter Sunday 2023 : प्रभू येशूंचा पुनर्जन्म झाल्याचा दिवस म्हणून साजरा करतात ईस्टर संडे; जाणून घ्या ईस्टर संडेचा इतिहास

गुड फ्रायडेच्या तीन दिवसानंतर प्रभू येशूंचा पुनर्जन्म झाल्याचे मरियमला समजल्याची कथा बायबलमध्ये नमूद आहे. त्यामुळे या दिवशी ख्रिश्चन बांधव ईस्टर संडे साजरा करतात. यावर्षी ईस्टर संडे रविवार 9 एप्रिलला साजरा करण्यात येत आहे.

Easter Sunday 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 7, 2023, 10:29 AM IST

Updated : Apr 9, 2023, 6:26 AM IST

हैदराबाद : क्रूसवर छळ करुन मारल्यानंतर प्रभू येशू यांनी गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी जन्म घेतल्याची कथा बायबल या ग्रंथात वर्णन करण्यात आली आहे. त्यामुळे गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवसानंतर येणाऱ्या रविवारी ख्रिश्चन बांधव ईस्टर संडे साजरा करतात. देवाच्या पुत्राने पुनर्जन्म घेतल्याचा हा दिवस असल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात. त्यामुळे जगभरातील ख्रिश्चन बांधव ईस्टर संडे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.

काय आहे वधस्तंभावर खिळवल्याचा इतिहास : जेरुसलेम येथील परिसरात प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करुन नागरिकांना देवाविषयी माहिती देत होते. त्यामुळे त्यांची ख्रिश्चन धर्माबाबतची माहिती नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजत होती. मात्र इतर धर्म प्रसारकांना ती आवडत नसल्याने ते प्रभू येशूचा तिरस्कार करत होते, असे म्हटले जाते. प्रभू येशू हे आपण देवाचे पुत्र असल्याचा दावा करत होते. त्यामुळे अनेक धर्म प्रसारकांना त्यांच्याविषयी तिरस्कार झाल्यामुळे त्यांनी प्रभू येशू यांच्याबाबत रोमन गव्हर्नरकडे तक्रार केली. येशू हे धर्म आणि राष्ट्रासाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी रोमन गव्हर्नरकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले. त्यामुळे येशूंवर देशद्रोहाच्या आरोपावरुन त्यांना सुळावर लटकवून छळ करुन मारण्यात आले.

काय आहे ईस्टर संडेचा इतिहास : प्रभू येशू यांच्या प्रभावी वाणीमुळे रोमनमधील नागरिक ख्रिस्ती धर्माकडे वलले. मात्र देशद्रोहाच्या आरोपात त्यांना रोमन सैनिकांनी वधस्तंभावर खिळवून छळकरुन करुन त्यांना मारले. प्रभू येशू यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या शिष्य असलेल्या जोसेफने कबरीत दफन केले. मात्र त्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू जीवंत झाल्याचे मरियमला दिसून आले. पुनर्जन्म झाल्यानंतर प्रभू येशू 40 दिवस आपल्या सहकाऱ्यांसोबत राहिल्याचेही बायबलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सुर्योदयाला महिला करतात पूजा : वधस्तंभावर अडकविल्यानंतर प्रभू येशू यांचा पुनर्जन्म झाल्यामुळे ईस्टर संडेला ख्रिश्चन नागरिक मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करतात. प्रभू येशूंचा पुनर्जन्म झाल्यानंतर ते सुर्योदयाच्या वेळी मरियमला दिसले. त्यामुळे या दिवशी महिला सुर्योदयाच्या वेळी प्रार्थना करतात. ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये दुपारीही प्रार्थना करुन प्रभू येशूंचा पुनर्जन्म झाल्याचा आनंद साजरा करतात.

हेही वाचा - Good Friday २०२३ : गुड फ्रायडेलाच काळा दिवस का म्हटले जाते? काय आहे इतिहास, जाणून घ्या कारण

Last Updated : Apr 9, 2023, 6:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.