हैदराबाद : लसणामुळे जेवणाची चव वाढते. आरोग्यासाठीही लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वेही लसणात आढळून येतात. यामुळे मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
शिजवलेले किंवा कच्चे लसूण कोणते चांगले आहे ? शिजवलेले लसून आणि कच्चा लसूण या दोघांचेही वैज्ञानिक फायदे सिद्ध झाले आहेत. कच्चा लसूण ठेचताना, चिरताना आणि चघळताना, अॅलिनेझ एन्झाइम सक्रिय होते आणि ऍलिसिन सोडते. ऍलिसिन हे कच्च्या लसणातील प्राथमिक बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे. ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जाते. लसूण शिजवताना सर्व महत्त्वपूर्ण एन्झाईम नष्ट होतात. अशाप्रकारे कच्चा लसूण सर्वाधिक फायदे देते हे सिद्ध होते. परंतु जास्त प्रमाणात लसूण खाणे हानिकारक आहे. जाणून घेऊया जास्त लसूण खाणे का आहे आरोग्यासाठी हानिकारक.
- पचनासंबंधित समस्या निर्माण होतात : जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी सारख्या समस्या होतात.
- श्वासाची दुर्गंधी होते : जास्त लसूण खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी होते. लसणात सलफर नावाचा घटक आढळतोय त्याने श्वासाच्या दुर्गंधीची समस्या होते.
- हृदय जळणे : लसूण जास्त खाल्याने अनेक वेळा छातीत जळजळ होते. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पोटात ऍसिडिटी वाढते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.
- रक्तस्त्राव : लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. लसणात रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर लसूण खाणे टाळावे.
- शरीराचा वास : कांदे आणि लसूणमध्ये सल्फ्यूरिक ऍसिड असते. यांच्या अतिसेवनामुळे ते घामात मिसळते आणि शरीरात दुर्गंधी निर्माण करते.
- कमी रक्तदाब : लसणाचे जास्त सेवन केल्याने अनेक वेळा लो ब्लडप्रेशरची समस्या सुरू होते. त्यामुळे चक्कर येणे सुरू होते. लसणात असे गुणधर्म आढळतात, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याच्या अतिसेवनामुळे रक्तदाब कमी होतो.
हेही वाचा :