ETV Bharat / sukhibhava

Mobile Use In Toilet : तुम्ही शौचालयात मोबाईल वापरत असाल तर व्हा सावध, होऊ शकतात हे आजार - टॉयलेट

अनेक तरुणांना टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरण्याची सवय असते. मात्र टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने मोठा धोका होण्याची शक्यता असते.

Mobile Use In Toilet
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 10, 2023, 3:11 PM IST

हैदराबाद : सध्याच्या युगात मोबाईल शिवाय दैनंदिन जीवन अवघड होऊन बसले आहे. ऑफिस ते मार्केटपर्यंतची बहुतांश कामे फक्त स्मार्टफोनद्वारे केली जातात. रात्री झोपतानाही आपण आपला फोन खिशात ठेवतो. मात्र काही तरुण टॉयलेटच्या सीटवर बसून गेम खेळतात. काहीजणांना तर मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याची सवयच लागते. तेव्हा मर्यादा ओलांडली जाते. मात्र टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याबाबत तुम्हाला माहिती आहे का ? असे करणे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात, याबाबतची माहिती खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होतो बॅक्टेरियाचा धोका : टॉयलेटमध्ये हानिकारक बॅक्टेरिया असतात. आपण टॉयलेटमध्ये बसून मोबाईल फोन वापरतो, तेव्हा त्याच हाताने जेट स्प्रे, टॉयलेट कव्हर आणि फ्लश बटणाला स्पर्श करतो. मोबाईलला हात लावल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर अनेक प्रकारचे हानिकारक जंतूचा संसर्ग होतो. तुम्ही तुमचे हात साबणाने स्वच्छ करू शकता, परंतु मोबाईल सहसा निर्जंतूक होत नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला पुन्हा स्पर्श करता, तेव्हा जेवणादरम्यान जंतू तुमच्या पोटात पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अपचन आणि संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो अतिसार : मोबाईल टॉयलेटमध्ये नेऊन वापरल्याने तो बॅक्टेरियाने दूषित होतो. त्यामुळे हाच मोबाईल आपण जेवताना वापरल्याने तेच बॅक्टेरिया आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे जुलाबासारख्या समस्या उद्भवू शकतात. बॅक्टेरियाने आतड्यांमध्ये जळजळ देखील होऊ शकते.

मूळव्याध होण्याचा आहे धोका : मूळव्याध होण्यामागे अनेक कारणे आहेत. मूळव्याध सहसा अपचनामुळे होतो. मात्र टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर केल्यानेही मूळव्याध या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जास्त काळ टॉयलेट सीटवर बसल्याने गुदद्वारातून रक्तस्त्राव होऊ लागतो. त्यासह गुदद्वाराला खूप जळजळ होते. सतत टॉयलेटमध्ये बसल्याने मांडीच्या स्नायूंवरही वाईट परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर आरोग्यास हानिकारक असल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा - National Pet Day 2023 : पाळीव प्राण्यांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय 'पेट' दिवस, जाणून घ्या इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.