जर तुमच्यापुढे एक ग्लास अर्धा रिकामा आणि अर्धा भरलेला ठेवला आणि तुम्हा तो अर्धा रिकामा न दिसता अर्धा भरलेला दिसला तर तुम्ही नेहमी जीवनाच्या उजळ बाजूकडे पहात आहात हे सिद्ध होते. तसे असल्यास, ही प्रवृत्ती आरोग्यासाठी चांगली असते. अनेक संशोधनातून हे खरे असल्याचे दिसून आले आहे. आशावादी लोक चांगल आरोग्य, चांगली झोप, कमी तणावाच आयुष्य जगतात. तसच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील उत्तम असते.
हेही वाचा- नवीन संशोधन - कॉफीच्या सेवनाने मूत्रपिंडाच्या तीव्र दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो
त्याचा अभ्यास करण्यासाठी, संशोधकांनी एक सर्वे केला. यात 50 ते 79 वयोगटातील सुमारे 1,60,000 महिलांशी त्यांनी 26 वर्षे संवाद साधला. सर्वेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या महिलांना आशावादी म्हणून वर्गीकृत करण्यात आले. ज्यांना सर्वात कमी गुण मिळाले त्यांना निराशावादी मानले गेले.
2019 मध्ये, संशोधकांनी केलेल्या सर्वेतील महिलांशी संवाद साधला..यात त्यांनी अद्याप जिवंत असलेल्या तसच मृत महिलांची नोंद करण्याचा प्रयत्न केला..यातील सहभागींचा पाठपुरावा केला. यात त्यांनी मरण पावलेल्या सहभागींचे आयुर्मान देखील पाहिले. ज्या आशावादाची होत्या त्या दीर्घायुष्यी आढळल्या. तर ज्या निराशावादी होत्या..त्यांचे आयर्मान कमी होते..
विकसित देशांत स्त्रियांचे सरासरी आयुष्य सुमारे 83 वर्षे आहे... हे लक्षात घेता संशोधक याला अपवादात्मक दीर्घायुष्य म्हणून संबोधतात. परंतु हा अभ्यास केवळ महिलांकडेच पाहिला असता, पुरुषांना हेच लागू होत का? हे सांगता येत नाही. पुरुष आणि महिला या दोघांकडे पाहिल्या गेलेल्या आणखी एका अभ्यासात वेगळेच आढळून आले आहे..यात आशावादाची उच्च पातळी असलेल्या लोकांचे आयुष्य कमीत कमी आशावादी असलेल्या लोकांपेक्षा 11% ते 15% जास्त होते.
मग आशावादी लोक जास्त काळ का जगतात? त्याचा निरोगी जीवनशैलीशी संबंध असू शकतो असे पहिल्या दृष्टीक्षेपात दिसून येत. उदाहरणार्थ निरोगी आहार असणे, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि धूम्रपान टाळणे यांच्याशी संबंध जोडले जातात. धूम्रपन टाळणे हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य आहे. जे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा आशावादी लोक त्याला सामोरे जातात. तेव्हा ते अॅडॉप्टिव्ह कॉपिंग स्ट्रॅटेजी वापरतात ज्याने त्यांना तणाव सोडवायला मदत होते. उदाहरणार्थ, आशावादी लोक समस्या सोडवण्याचा आणि तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग आखतात...
संशोधकांच्या मते सामान्यत: आशावाद हा तुलनेने स्थिर व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य म्हणून पाहिले जाते... जे अनुवांशिक आणि बालपण या दोन्ही प्रभावांद्वारे निर्धारित केले जाते..जस की तुमचे तमुच्या पालकांशी किंवा निकटवर्तीयांशी चांगले संबंध असणे. परंतु जर तुम्ही नैसर्गिकरित्या पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला पाहून शकत नसाल, तर तुम्ही आशावादी होण्याची क्षमता वाढवू शकता असे काही मार्ग आहेत. संशोधन दाखवते की आशावाद छोट्या छोट्या गोष्टींतून कालांतराने बदलू शकतो उदाहरणार्थ, भविष्यात आपण सर्वोत्कृष्ट असू शकतो अशा स्वत: बद्दल कल्पना करणे आणि नंतर ते लिहिणे..याने आशावाद लक्षणीयरीत्या वाढू शकतो, असं संशोधकांकडून सांगण्यात येत आहे..परंतु सर्वोत्तम परिणामांसाठी, केवळ इच्छापूर्ण विचार करणे टाळले पाहिजे. त्या एवजी सकारात्मक आणि वाजवी दोन्ही विचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केवळ सकारात्मक भविष्यातील घटनात्मक विचार करणे देखील आशावाद वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
हेही वाचा- इस्रायली शास्त्रज्ञांची एड्ससाठी नवीन अनुवांशिक उपचार पध्दती