ETV Bharat / sukhibhava

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊच नका ! - किडे आणि बॅक्टेरिया

पावसाळ्यात आपले शरीर थोडे अशक्त होते. म्हणूनच अशा दिवसांत काय खावे आणि काय खाऊ नये यावर जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक असते. काही पदार्थ पचायला जड असतात. म्हणून या ऋतूत असे पदार्थ खाणे टाळणे गरजेचे असते. हिरव्या भाज्या अजिबात खाऊ नयेत. तथापि, तुम्ही जर भाज्यांशिवाय राहू शकत नसाल तर त्या धुवून योग्य प्रकारे शिजवल्यानंतरच त्याचे सेवन करावे. तसेच पावसाळ्यात कच्च्या भाज्यांचे सेवन करुच नये.

Green Leafy Vegetables
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊच नका
author img

By

Published : Aug 1, 2020, 2:03 PM IST

संतुलित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांबरोबरच सर्व पोषक घटकांचा समावेश असतो. परंतु पावसाळ्याच्या दिवसांत डॉक्टर बहुदा लोकांना पालेभाज्यांचा खाण्यापासून परावृत्त करत असतात. कारण या दिवसांत पालेभाज्या फारशा निरोगी राहत नाहीत. तसेच या ऋतुत पालेभाज्या बर्‍याच रोगांचे कारण बनू शकतात. या भाज्या पावसाळ्यात शरीरासाठी घातक का असतात, याची काही कारणे येथे दिली आहेतः

किडे आणि बॅक्टेरिया

हिरव्या पालेभाज्या ह्या अनेक लहान कीटके, जीवाणू आणि सूक्ष्मजीव यांच्या प्रजननाचे उत्कृष्ट स्थळ असते. ज्यामुळे या पालेभाज्या दूषित होत असतात. म्हणूनच, जे कोणी अशा भाज्यांचे सेवन करतो, त्यांच्यासाठी ते विविध रोगांचे कारण बनू शकतात.

फार स्वच्छ नसतात

पावसाळ्याच्या दिवसांत अशा भाज्या व्यवस्थित न धुतल्याने त्यावर काही प्रमाणात घाण तशीच राहते. यामुळे पोटात संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच, तुम्हाला जर भाज्या टाळता येणे शक्य नसले, तर त्या भाज्या चांगल्या प्रकारे धुऊन आणि योग्य प्रकारे शिजवल्यानंतरच सेवन करा.

या भाज्या दलदलीत वाढलेल्या असतात

बहुतेक वेळा हिरव्या पालेभाज्या पावसाच्या पाण्यात किंवा दलदलीच्या भागात वाढलेल्या असतात. अशा ठिकाणी बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असते. म्हणुन अशा भाज्या खाल्ल्याने जुलाब, उलट्या आदी समस्या उद्भवू शकतात.

पुरेसा सुर्यप्रकाश नसतो

इतर ऋतूंमध्ये, सूर्यप्रकाश हा एक जंतुनाशकाचे काम करत असतो. सुर्यप्रकाशामुळे पालेभाज्या खाण्यायोग्य सुरक्षित बनतात. परंतु पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश नसतो. त्यामुळे भाज्यांमध्ये किडे तसेच टिकून राहतात आणि संसर्ग वाढत जातो. अशा भाज्या खाल्ल्याने लोकांना कॉलरा, टायफाइड, अतिसार इत्यादी सारख्या आजारांचा त्रास होऊ शकतो.

चयापचय यंत्रणेवर परिणाम

पावसाळ्यात आपली चयापचय यंत्रणा आधीच कमकुवत असते. शिवाय याची विशेष काळजी घेणेही आवश्यक असते. त्यामुळे तेलकट, मसालेदार, न शिजलेले आणि पालेभाज्यांचे सेवन करणे टाळले पाहिजे. अन्यथा अपचन आणि उलट्या होण्याचा धोका वाढू शकतो.

शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते

आयुर्वेदानुसार, पावसाळ्याच्या दिवसात शरीरात वात आणि पित्ताचे दोष वाढतात. टोमॅटो, चिंच, लोणची आणि हिरव्या भाज्या या आंबट गोष्टी शरीरात पित्त तयार करतात. तर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात वात दोष तयार होतो. म्हणूनच असे पदार्थ टाळणे आवश्यक आहेत. तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अपचन आणि पचनासंबंधीत इतर समस्या उद्भवतात.

पावसाळ्यात आपले शरीर थोडे अशक्त होते. म्हणूनच अशा दिवसांत काय खावे आणि काय खाऊ नये यावर जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक असते. पाऊस नक्कीच गरम, कुरकुरीत आणि तळलेली भजी (पकोडा) खाण्याची इच्छा निर्माण करतो. परंतु यामुळे पचनासंबंधीत उद्भवणाऱ्या समस्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही पदार्थ पचायला जड असतात. म्हणून या ऋतूत असे पदार्थ खाणे टाळणे गरजेचे असते. हिरव्या भाज्या अजिबात खाऊ नयेत. तथापि, तुम्ही जर भाज्यांशिवाय राहू शकत नसाल तर त्या धुवून योग्य प्रकारे शिजवल्यानंतरच त्याचे सेवन करावे. तसेच पावसाळ्यात कच्च्या भाज्यांचे सेवन करुच नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.