ETV Bharat / sukhibhava

कोविड : ताण तणाव, दु:ख आणि अडथळे

author img

By

Published : May 13, 2021, 8:47 PM IST

संसर्गाचे क्षेत्र सर्वसाधारणपणे मर्यादित मानले जाते आणि संसर्ग झालेली व्यक्ती इतर ठिकाणी जोपर्यंत प्रवास करत नाही, तोपर्यंत हा संसर्ग पसरत नाही. कोरोना संसर्ग हे भारत आणि परदेशातील शास्त्रज्ञांसाठी नवीन नाव नाही. परंतु या विषाणूचा तीव्र स्वरूपात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने लोकांवर परिणाम झाला आहे. परंतु या परिस्थितीमुळे समाजात भीती पसरली आहे. घाबरण्याचे मुख्य कारण म्हणजे या संसर्गाशी संबंधित मूलभूत माहितीबद्दल संभ्रम आणि योग्य माहितीचा अभाव हे आहे.

कोविड
कोविड

कोरोनाच्या संदर्भात संशोधन आणि संघर्षात गुंतलेल्या लोकांचा असा विश्वास आहे की जर या साथीची योग्य आणि आवश्यक माहिती योग्य लोकांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली तर या मानवनिर्मित साथीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकते. आयुर्वेद आणि रसायनशास्त्राचा इतिहास या विषयात पीएचडी असलेले डॉक्टर पी. व्ही. रंगनायकुलू यांना विश्वास आहे की महामारीशास्त्रात प्रवीण असलेल्या व्यक्ती या साथीच्या रोगाविषयी योग्य आणि अधिक चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात. म्हणूनच कोविड संदर्भातली सर्व माहिती त्यांच्या द्वारेच दिली जावी. डॉक्टर पी. व्ही. रंगनायकुलू यांनी कोविड संदर्भात उचललेल्या महत्त्वाच्या कृतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

मूळ कारणांबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे

डॉ. रंगनायकुलू सांगतात की सुमारे सात दशकांपूर्वी गणितज्ञ, विद्वान आणि तत्वज्ञानी बर्ट्रेंड रसेल यांनी आपल्या लिखाणात मानवांनी टप्प्याटप्प्याने केलेल्या संघर्षाचा आणि मानवी विकासाच्या प्रक्रियेत येणाऱ्या प्रतिकूल परिस्थिती व अडचणींवर विजय मिळवण्याचा उल्लेख केला होता. उदाहरणार्थ, हत्ती, सिंह यासारख्या मोठ्या प्राण्यांविरूद्ध सर्वप्रथम युद्ध कसे जिंकले आणि हळूहळू सूक्ष्म जीवाणूंवर आणि त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही काही प्रमाणात नियंत्रण करण्यात यश कसे मिळवले हे नमूद केले. परंतु वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारची प्रगती असूनही, मानवासमोरच्या या जिवाणूंच्या समस्येवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्याद्वारे उद्भवलेल्या रोगांवर पूर्णपणे उपचार करणे अद्याप कठीण आहे. जीवशास्त्रज्ञांनी या संदर्भात सातत्याने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की निसर्गाला जीवन देणाऱ्या काही प्रमुख नैसर्गिक प्रयोगांमध्ये व्हायरस हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यामुळे उद्भवणार्‍या समस्या आणि परिस्थितींचा जीवनावर परिणाम होतो. कोविड ही एक जिवाणू समस्या देखील आहे. हा नवीन विषाणू आपल्या जीवन प्रणालीत प्रवेश करून जगभरातील लोकांच्या आयुष्यावर परिणाम करत आहे.

अज्ञानामुळे संभ्रम वाढतो -

डॉक्टर रंगनायकुलू स्पष्ट करतात की संसर्गाचे क्षेत्र सर्वसाधारणपणे मर्यादित मानले जाते आणि संसर्ग झालेली व्यक्ती इतर ठिकाणी जोपर्यंत प्रवास करत नाही, तोपर्यंत हा संसर्ग पसरत नाही. कोरोना संसर्ग हे भारत आणि परदेशातील शास्त्रज्ञांसाठी नवीन नाव नाही. परंतु या विषाणूचा तीव्र स्वरूपात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने लोकांवर परिणाम झाला आहे. परंतु या परिस्थितीमुळे समाजात भीती पसरली आहे. घाबरण्याचे मुख्य कारण म्हणजे या संसर्गाशी संबंधित मूलभूत माहितीबद्दल संभ्रम आणि योग्य माहितीचा अभाव हे आहे.

सध्या कोरोनाशी संबंधित सनसनाटी बातम्या अनेक प्रकारच्या माध्यमांतून प्रसारित केल्या जात आहेत. परिणामी, या संसर्गाची उत्पत्ती, तिची प्रवृत्ती आणि त्यासंदर्भात योग्य माहिती हे सर्व काही लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याचप्रमाणे साथीचे रोगशास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ साथीच्या रोगाबद्दल अधिक चांगली आणि अचूक माहिती देऊ शकतात. कारण ते या विषाणूच्या मूळापर्यंत जाऊ शकतात. मूळ समजून ते नष्ट करण्याचे धोरण किंवा उपचार पद्धती आखू शकतात.

डॉक्टर रंगनायकुलू स्पष्ट करतात की महामारीशास्त्रज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट सतत कोरोना व्हायरसच्या वर्तनाबद्दल, त्याच्या उत्पत्तीबद्दल विविध शोध, अनेकविध माध्यमांद्वारे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच, कोविड सारख्या साथीच्या रोगाशी संबंधित योग्य माहितीविषयी जनजागृती करण्यासाठी या तज्ज्ञांची मदत घेणे फार महत्वाचे आहे.

सामाजिक मानसिक समस्या

डॉक्टर रंगनायकुलू सांगतात की मागील वर्षभराच्या अनुभवाचा विचार केला तर असे दिसून आले की संसर्ग झालेल्या सुमारे 81 टक्के लोकांना सामान्यत: कमी किंवा मध्यम किंवा फारच क्वचितच लक्षणे आढळतात. त्यांना बरे होण्यासाठी जास्त किंवा कोणत्याही विशेष उपचारांची आवश्यकता लागत नाही. संसर्गाची माहिती मिळाल्यानंतर आवश्यक दक्षता घेतल्यास संसर्ग पसरण्याचा धोका वाढणार नाही आणि लोकांमध्ये भीती निर्माण होणार नाही. परंतु सामान्यत: असे नसते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा मानवी प्रवृत्तीनुसार, सामान्यत: इतरांना संसर्ग झाल्यास संसर्गग्रस्त लोकांना दिलासा मिळतो आणि इतरांना या आजाराने ग्रासले आहे, असे कळले की त्यांनाही बरेचसे सुरक्षित वाटते. त्यामुळे कळत नकळत ते सामाजिक सुरक्षा मापदंडांकडे लक्ष देत नाहीत. एकंदरीत ही सामाजिक मानसिक समस्या आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पायाभूत सुविधांवर वाढता ताण

डॉक्टर रंगनायकुलू सांगतात की 10 टक्के संक्रमित लोकांना जरी लक्षणे दिसली तरीही रुग्णालयात भर्ती व्हायची गरज नसते. पण याच अज्ञानापोटी पायाभूत सुविधांवर ताण पडतो. आताची परिस्थिती पाहता, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, आपल्या पायाभूत सुविधांकडे जास्त संक्रमित रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता नाही. आता सरकारी व्यवस्थाही शिथिल व्हायला लागली आहे.

डॉक्टर रंगनायकुलू सांगतात, चुकीच्या सूचना, माहिती किंवा पसरवला जाणारा संभ्रम यापासून वाचण्यासाठी पुढील तथ्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. महागडी अँटिव्हायरल औषधे काही वेळच फायदेशीर असतात. तो निर्णय तज्ज्ञ विचारपूर्वक घेतात. म्हणून या औषधांच्या काळ्या बाजाराला प्रोत्साहन देऊ नका. या विषाणूचा संसर्ग झाला तर रक्तात गाठी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि गरज असेल तरच रक्तात गुठळ्या होऊ नयेत म्हणून औषधे घ्या.

अॅलोपथी औषधांबरोबर आयुर्वेदिक औषधांचे सेवन तज्ज्ञाच्या सल्ल्याने करता येईल. वासारिष्ट, वसा कांताकारी लेह्यम, अगस्त्य हरीतकी लेह्यम, दशामुला हरितकी, यष्टिमध तसेच द्राक्षारिष्ट यांचे सेवन करता येईल. कोरोना विषाणू सर्वसाधारणपणे थंड ठिकाणी किंवा जिथे सापेक्ष आद्रता 50 टक्क्यांहून कमी असेल तिथे राहतो. त्यामुळे या उन्हाळ्यात घरातली आद्रता त्या प्रमाणात कायम ठेवा.

कोविडच्या लक्षणांबद्दल अचूक माहिती तुमच्याकडे असलीच पाहिजे. याचे मुख्य लक्षण म्हणजे ताप, खोकला तसेच थकावट आहे. त्याशिवाय तोंडाची चव जाणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, शरीरात वेदना होणे, डोकेदुखी, घसा दुखणे, नाक चोंदणे, डोळे लाल होणे, अतिसार, त्वचेवर लाल चट्टे येणे अशीही लक्षणे दिसू शकतात.

आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन डी, सी तसेच जस्त यांसारखे माइक्रोन्यूट्रिएंट्स उपयोगी पडतात. म्हणून यांचे स्वन नियमित करा. कोरोनाचा संसर्ग पाण्यातून होत नाही. म्हणून स्वीमिंग पुलच्या वापराने हा संसर्ग वाढत नाही. पण त्या दरम्यान कोणा संक्रमित व्यक्तीमुळे हा संसर्ग होऊ शकतो.

अल्कोहोलमुळे कोरोना विषाणूपासून तुम्ही वाचू शकत नाही. माशा कोरोना विषाणूचा फैलाव करत नाहीत. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर २ टक्के लोकांच्या जिवाला धोका असतो. म्हणून कोविड झाला तर जास्त ताण घेऊ नका. इन्फ्लुएंझा ए आणि बी, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू आणि इतर काही संक्रमणांमुळे मानवी फुफ्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. कोरोना व्हायरस देखील यासारखेच एक संक्रमण आहे. हे सर्व संक्रमण स्वत:ला मर्यादित करतात. ज्यांना लठ्ठपणा, मधुमेह, श्वसन यांचे आजार आहेत, म्हणजे कोमोरबिडीटी आहे, त्यांनी जास्त सावधानता बाळगली पाहिजे.

ताणतणाव, दु:ख देणाऱ्या, संभ्रमित करणाऱ्या सोशल मीडियावरच्या बातम्यांपासून दूरच राहा. जिथे खरी माहिती मिळते, तीच साइट पाहा. हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे की, पल्स ऑक्सिमीटर कधीही ऑक्सिजनची योग्य पातळी सांगत नाही. ऑक्सिमीटरद्वारे दाखवलेली ऑक्सिजनची पातळी योग्य पातळीपेक्षा कमीच असते. स्वत:च्या तसेच दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरणे खूप आवश्यक आहे.

जेव्हा वैद्यकीय यंत्रणेत कमतरता येते तेव्हा योग्य माहिती वापरून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे. कोरोनापासून संरक्षण मिळवण्याचा दावा करणाऱ्या इतर थेरपिस्टच्या अस्पष्टतेविषयी आणि अपयशाबद्दल बोलणे किंवा त्यांना दोष देणे यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. ही बाब कोरोना विषाणूलाही लागू आहे. इथे जगाचा अंत होणार नाही. आपल्या मनातल्या शंका आणि भीती यामुळे आपले नुकसान होऊ शकते, विषाणूचे नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.