ETV Bharat / sukhibhava

कोरोनापासून संरक्षणासाठी कोव्हॅक्सिन

author img

By

Published : Feb 4, 2021, 11:40 AM IST

गेल्या वर्षाभरापासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी विविध लसींची निर्मिती केली तर, काहींचे संशोधन सुरू आहे. सध्या भारतात जगातील सर्वात मोठे कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान सुरू आहे.

covaxin
कोव्हॅक्सिन

हैदराबाद - विविध लसींमुळे दर वर्षी कोट्यवधी लोकांचे जीव वाचतात. लसी या जंतूंचाच एक भाग आहेत. जे आपल्या शरीरात सोडले जातात. शरीराची त्यांच्याशी ओळख होते आणि शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. म्हणजे कधी शरीरात खऱ्या जंतूंनी प्रवेश केलाच तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शरीर तयार असते आणि संसर्ग होत नाही. ईटीव्हीच्या सुखीभव टीमने फार्मा स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट स्वरूप पांडा यांच्याशी याबद्दल चर्चा केली.

सध्या कोविड-१९ लसीचे ५० हून जास्त प्रकार आहेत. कोरोना विषाणूसाठी जर आपल्याकडे स्पाइक प्रोटीनविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज असतील तर हा रोग होण्याची शक्यता खूपच कमी असते. अँटीबॉडीज तयार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्पाइक प्रोटिनचा भाग असलेली लस टोचून घेणे किंवा स्पाइक प्रोटिनच घेणे. स्पाइक प्रोटिन शरीरात घेतले तर ते शरीराला स्पाइक प्रोटिन कसे बनवायचे याच्या सूचना देते आणि शरीराला ते तयार करू देते. लसीमध्ये असलेले स्पाइक प्रोटिन हे एकदम कमकुवत असते. त्यामुळे कुठलाही आजार होत नाही. म्हणूनच लस टोचून तुम्ही आजारी पडत नाही.

कोविड-१९ची लस तुमच्या शरीरात तुम्हाला आजारी न पाडता या रोगाविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते. ज्या लोकांपासून तुम्हाला कोविड-१९ होण्याचा धोका आहे, त्यांच्यापासून ही लस तुमचे संरक्षण करते. देशभरात केलेल्या अभ्यासानुसार ही लस घेणे तुम्ही सहन करू शकता, ती सुरक्षित आहे आणि ठराविक अँटीबॉडीज निर्माण करून ती तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

या लसीच्या फायद्याच्या तुलनेत दुष्परिणाम एकदम कमी आणि सहन करू शकू असे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, लस अधिकृत करण्याआधी ती किती सुरक्षित आहे, हे तपासले जाते. कोव्हॅक्सिन ३० हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर वापरून पाहिली गेली आहे. नंतरच ती अधिकृत केली गेली. या लसीचे परिणाम समाधानकारक आल्यानंतरच भारतातल्या ड्रग कंट्रोल जनरलने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ही माहिती नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन लसी प्रशासन (एनईजीव्हीएसी) च्या मार्गदर्शनावर आधारित आहे.

कोविड १९ लस ही वेगवेगळ्या टप्प्यांत दिली जाईल. पहिला टप्पा पुढीलप्रमाणे आहे.

  • आरोग्य सेवक – आरोग्य सेवा देणारे आणि त्यात काम करणारे कामगार ( सार्वजनिक आणि खाजगी ). यात आयसीडीएस कामगारही येतात.
  • फ्रंटलाईन सेवक - राज्य आणि केंद्रीय पोलीस विभाग, सशस्त्र सेना, गृह, रक्षक, तुरूंगातील कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि नागरी संरक्षण संघटना, नगरपालिका कामगार आणि कोविड १९ च्या वेळी टन्टेंटमेंटवर देखरेख करणारे महसूल अधिकारी, इतर अधिकारी
  • मधुमेह, रक्तदाब, कँसर, फुफ्फुसाचे विकार असणारे ५० वर्ष वयाच्या पुढच्या व्यक्ती
  • या टप्प्यामध्ये ३० कोटी लोकसंख्येला लस मिळेल असा अंदाज आहे.

मुख्य निर्णय हा नेहमीच जोखीम किती आहे, हे पाहूनच घेतला जातो. उदाहरणार्थ, एरियनॉन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, इम्युनोलॉजी आणि हायजीन या संस्थेचे संचालक, ते लसीकरणासाठी स्थायी समितीचे सदस्यही आहेत. त्यांनी जर्मन प्रेस एजन्सीला सांगितले की, एखाद्या वयस्कर व्यक्तीची कोरोना विषाणूमुळे मरण्याची शक्यता २० टक्के असेल आणि त्याच वेळी कोरोनाची लस टोचून होणारे दुष्परिणाम एक लाख पन्नास हजारात एक इतकेच असतील तर ते लसीच्या दुष्परिणामाचा धोका स्वीकारतील.

तुम्ही पुढील कारणांसाठी कोविड लस घेऊ शकत नाही –

  • तुम्हाला अ‌ॅलर्जी असेल तर
  • तुम्हाला ताप असेल तर
  • रक्तस्रावाचा त्रास होत असेल किंवा रक्त पातळ असेल
  • रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होईल अशी औषधे घेतली असतील तर
  • गरोदर स्त्रिया
  • स्तनपान देणाऱ्या स्त्रिया
  • कोविड १९ ची दुसरी लस घेतली असेल तर
  • लसीकरणाचे पर्यवेक्षक, अधिकारी यांनी ठरवल्याप्रमाणे आरोग्याशी संबंधित असलेले इतर गंभीर प्रश्न
  • लस, तिची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबाबत काही शंका असल्यास आपल्या फॅमिली फिजिशियनचा सल्ला घ्या.

(लेखक स्वरूप पांडा सध्या जपान आणि एपीईसी देशांमध्ये राबवण्यात येणाऱ्या डिफरंटिनेटेड कस्टमर करियर जर्नी मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पासाठी काम करत आहेत.)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.