ETV Bharat / sukhibhava

Corn Benefits For Health : कॅन्सरचा धोका कमी करण्यासह मकाचे 'हे' आहेत आरोग्याला मिळणारे फायदे - risk of cancer

वेगवेगळ्या प्रकारची धान्ये आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सर्वांना खायला आवडते अशा धान्यांपैकी मका देखील एक धान्य आहे. जर तुम्हालाही मका खायला आवडत असेल तर त्याचे फायदे जाणून घ्या.

Corn Benefits
अनेक समस्यांवर फायदेशीर आहे मका
author img

By

Published : Jul 17, 2023, 11:27 AM IST

हैदराबाद : मका खाल्याने शरीराला फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. डोळ्यांसाठी आणि पचनासाठीही हे खूप फायदेशीर आहे. मका हा जरगातील लोकप्रिय धान्यांपैकी एक आहे. यापासून पॉपकॉर्न आमि स्वीटकॉर्न बनवले जातात. सर्वांना हे वेगवेगळ्या प्रकारे खायला आवडतात. मका हा चवीला चांगला असून आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. जाणून घ्या मक्याचे फायदे...

मका खाण्याचे फायदे:

  • पचनासाठी चांगली : मका हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जो तुमच्या पचनसंस्थेसाठी चांगला आहे. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता यापासून मुक्त होण्यासही हे उपयुक्त आहे.
  • हृदयासाठी चांगले : मका अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे जो तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चल्लीमुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. मक्यामध्ये विरघळणारे फायबर असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
  • कॅन्सरचा धोका कमी करते : मक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे कारण अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल संयुगांच्या नकारात्मक प्रभावांना तटस्थ करतात. त्यामध्ये फ्युरुलिक अॅसिड असते ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
  • डोळ्यांसाठी चांगले : मक्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. हे एक संयुग आहे जे व्हिटॅमिन ए तयार करण्यास मदत करते. हे जीवनसत्व तुमची दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांशी संबंधित विविध समस्या टाळण्यासाठी ओळखले जाते. याव्यतिरिक्त मक्यामध्ये असलेले कॅरोटीनोइड्स स्नायूंचा अपव्यय टाळतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते : मका हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे जो तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. व्हिटॅमिन सी तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि जखमा बरे करण्यास मदत करते.
  • हाडे मजबूत करते : मका फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. ही खनिजे तुमच्या हाडांचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते संधिवात सारख्या हाडांशी संबंधित अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतात.
  • त्वचेसाठी फायदेशीर : वयानुसार आपली त्वचा फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानास अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे सुरकुत्या दिसू लागतात. मक्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते तुमची त्वचा निरोगी ठेवतात आणि वृद्धत्वाची चिन्हे टाळतात.

हेही वाचा :

  1. Health Tips : गॅसच्या समस्येने हैराण, तर या उपायांचा करा अवलंब मिळेल आराम
  2. Food For Eye : चांगल्या दृष्टीसाठी हे पदार्थ आहारात ठेवा
  3. Restless Leg Syndrome : रेस्टलेस लेग सिंड्रोमचा नियमित जीवनावर होऊ शकतो परिणाम, जाणून, घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.