ETV Bharat / sukhibhava

आरोग्यदायी भविष्यासाठी काॅर्ड रक्तसंचय - blood cancer

दर वर्षी जुलै महिना हा रक्त जागरुकता महिना म्हणून साजरा होतो आणि आज आपण काॅर्ड रक्त आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. रेणुका गुप्ता म्हणतात, ‘ जन्मानंतर बाळाच्या नाळेमध्ये खास पेशी असते. तिला स्टेम सेल्स म्हणतात. कालांतराने या पेशींचे रूपांतर रक्त पेशीत होते. या पेशी संसर्गाविरोधात लढा देऊ शकतातच, शिवाय शरीरात ऑक्सिजनचे वहन करून रक्ताच्या गुठळ्या करण्यास यांची मदत होते.’

Cord Blood Storage For A Healthy Future
रक्त जागरुकता महिना
author img

By

Published : Aug 6, 2020, 4:16 PM IST

पालकत्व हे कठीण असू शकते आणि त्यात अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातलाच एक महत्त्वाचा आणि आयुष्य वाचवणारा निर्णय म्हणजे तुमच्या बाळाच्या भविष्यातल्या आरोग्यासाठी नाळेतून रक्त घेऊन ते साठवून ठेवायचे. नाळ ही बाळ पोटात असताना आई आणि बाळाला जोडणारी असते. पुढे जाऊन तुमच्या बाळाला ब्लड कॅन्सर, अप्लास्टिक अॅनिमिया किंवा थॅलेसिमियासारखे आजार झाले तर या काॅर्ड रक्तसंचयामुळे त्याला किंवा तिला आपला आजार बरा होण्याची संधी मिळू शकते.

काॅर्ड रक्तसंचयाची गरज का आहे ?

दर वर्षी जुलै महिना हा रक्त जागरुकता महिना म्हणून साजरा होतो आणि आज आपण काॅर्ड रक्त आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. रेणुका गुप्ता म्हणतात, जन्मानंतर बाळाच्या नाळेमध्ये खास पेशी असते. तिला स्टेम सेल्स म्हणतात. कालांतराने या पेशींचे रूपांतर रक्त पेशीत होते. या पेशी संसर्गाविरोधात लढा देऊ शकतातच, शिवाय शरीरात ऑक्सिजनचे वहन करून रक्ताच्या गुठळ्या करण्यास यांची मदत होते.

काॅर्ड रक्तसंचयाबद्दल लोकांना अजून फारसे माहीत नाही. याबद्दल सांगताना रेणुका म्हणतात, आपल्या देशात रक्तात झालेल्या बिघाडासाठी साठवलेल्या काॅर्ड रक्ताचा वापर फार कमी केला जातो किंवा स्टेम प्रत्यारोपणातही असा वापर करताना फारसे आढळत नाही. यामागे दोन कारणे असावीत. एक तर लोकांना याबद्दल फारसे माहीत नाही, ते याबद्दल जागरुक नाहीत किंवा उपचारादरम्यान संचय केलेले रक्त घेऊन येण्यासाठी अत्यंत कमी वेळ असू शकतो.

त्यांनी आम्हाला हेही सांगितले की नाळेवरचे संशोधन अजून सुरू आहे. याचा फायदा ज्या आजारांवर होऊ शकतो, असे आजारही सध्या मर्यादित आहेत. तरीही डाॅक्टर आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे नियमित संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्रात होणारी प्रगती यामुळे नाळेच्या काॅर्ड ब्लड सेलचा उपयोग अनेक आजारांवरच्या उपचारासाठी होऊ शकतो. रक्तातला बिघाड, सेरेब्रल पाल्सी, टाइप १ मधुमेह, हायड्रोसेफेलस आणि मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या आजारांवर काॅर्ड ब्लड सेल प्रभावी पडू शकते.

काॅर्ड ब्लड सेल कसे एकत्रित केले जाते ?

डाॅ. रेणुका गुप्ता म्हणाल्या, बाळाच्या जन्मानंतर जेव्हा नाळ कापली जाते , तेव्हा डाॅक्टर नाळेशी जोडलेल्या भागातून रक्त काढतात. हे रक्त खास पिशवीत भरले जाते. अत्यंत जलद अशा या प्रक्रियेतून ६० – १५० मि.ली. रक्त काढले जाते आणि ते सिलबंद केले जाते. ४८ तासाच्या आत ते रक्तपेढीच्या प्रयोगशाळेत पाठवले जाते. तिथे त्यावर प्रक्रिया करून बराच काळासाठी ठेवले जाते. सर्वसाधारणपणे हे २१ वर्षांसाठी ठेवतात. पण कोणी इच्छा व्यक्त केली तर ते जास्त काळासाठीही ठेवले जाते.

जगभरात कॉर्ड ब्लड स्टेम सेल हे ठराविक जीवघेणे कर्करोग आणि अनुवंशिक आजार यांसाठी वापरले जाते. म्हणूनच पालकांनी याबद्दल जास्त जागरुक राहायला हवे. प्रसूतीआधीच निर्णय घ्या आणि त्यांच्या बाळाच्या भविष्यातल्या सुदृढ आरोग्यासाठी याचे जतन करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.