हैदराबाद : अतिसंवेदनशील प्रतिकारशक्तीच्या दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारा (एफडीए) मंजूर केलेले औषध, कोविड -१९ आजाराने गंभीर असलेल्या रुग्णांसाठी वापरले जाऊ शकते का याची तपासणी सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे संशोधक करत आहेत. हे औषध डॉक्टरांना संशय असलेल्या फुफ्फुस, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांमधील कोरोनाविषाणूच्या संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रथिनांला अवरोधित (ब्लॉक) करते.
रावुलिझुमब नावाचे औषध हे एक एकल प्रतिपिंड आहे जे शरीरात संसर्ग प्रसारास प्रतिकारक प्रतिसाद आणि रक्त गोठण्यास नियंत्रित करणाऱ्या कोग्युलेशन कॅस्केडच्या छेदनबिंदूवर बसून एक पूरक प्रणाली म्हणून प्रतिबंध करते. एटिपिकल हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम आणि पॅरोक्सिस्मल नॉक्टर्नल हिमोग्लोबिनूरिया या दोन दुर्मिळ अनुवंशिक रोगावर उपचार करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) याला मंजुरी दिली आहे. या दोन्ही आजारात लहान रक्तवाहिन्यांमध्ये जीवघेण्या रक्त गुठळ्या (ब्लड क्लॉटिंग) तयार होतात.
“आम्ही कोविड-१९ आजारात फुफ्फुसाची गंभीर गुंतागुंत झालेल्या रूग्णांसाठी हे एफडीए-मान्यताप्राप्त औषध वापरत आहोत. कारण, बरोबर हीच समस्या या दोन अनुवंशिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये देखील आढळून येते. या आजारामध्ये शरीर स्वास्थ पूरक प्रणाली नियंत्रणात नसते." असे या चाचणीचे मुख्य तपासनीस आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील पल्मोनरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिन विभागातील वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापक, हृषिकेश एस. कुलकर्णी यांनी सांगितले.
“असे आढळून आले आहे की, कोविड १९ रूग्णांमध्ये अवयवाच्या नुकसानीसाठी पूरक प्रणालीची सक्रियता कमी अधिक प्रमाणात अंशतः जबाबदार असते. आमचा विश्वास आहे की या सक्रियतेस अवरोधित करणे हा एक व्यवहार्य दृष्टीकोन आहे."
अल्टोमिरिस या ब्रँड नावाने रावुलिझुमब बनविणारी अलेक्सियन फार्मास्युटिकल्स या या चाचणीचे नेतृत्व करत आहे. या क्लिनिकल चाचणीत भाग घेणार्या चार देशांमधील ५० साईट्सपैकी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन ही एक आहे. या अंतर्गत चाचणीची तपासणी करण्यासाठी जगभरातून २७० प्रौढ रूग्णांची नोंद करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे २० जण बार्नेस-ज्यू हॉस्पिटलमधील असतील. या रुग्णांपैकी - ज्या रुग्णांमध्ये कोविड-१९मुळे गंभीर न्यूमोनिया, फुफ्फुसाचे नुकसान होऊन किंवा तीव्र श्वसनाच्या त्रासामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता आहे - त्यांना इंट्राव्हेनस रावुलिझुमब तसेच सर्वोत्तम सहाय्यक सुरक्षा किंवा मानक प्राप्त सहाय्यकारी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
या तपासणी चाचणी पथकातील सहाय्यक सदस्य आणि औषध विषयाचे आणि नेफ्रोलॉजिस्ट एमडी अनुजा जावा यांच्यामते अनुवांशिक रोग एटिपिकल हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोममध्ये ज्या प्रकारे मूत्रपिंडाला हानी पोचते तीच स्थिती कोविड १९ रूग्णांमध्ये आढळून येते.
जॉन कोचरन व्हेटेरियन्स अफेयर्स सेंट लुईस हेल्थ केअर सिस्टमच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या क्लिनिकचे मार्गदर्शक म्हणून देखील काम पाहणारे जावा म्हणाले, “कोविड -१९मध्ये मूत्रपिंडाचा नाश ही एक बऱ्यापैकी आढळून येणारी एक गुंतागुंत आहे ज्यामध्ये बर्याच रूग्णांना डायलिसिस आवश्यक असते." “ कोविड १९मध्ये पूरक यंत्रणेच्या संभाव्य भूमिकेबद्दल जे आमचे आकलन आहे त्याचा थेट परिणाम म्हणून ही क्लिनिकल चाचणी आहे. योग्य वेळी पूरक इनहिबिटरचा वापर करून या प्रणालीला अद्ययावत करून रूग्णांना मदत होऊ शकते का हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ”
ऑनलाईन जर्नल 'जेसीआय इनसाइट'मध्ये प्रकाशित झालेल्या एका आढावा लेखात, अतिशय संवेदनशीलतेने कार्यरत असलेली पूरक प्रणाली शरीरात कसा समतोल साधते याविषयीची माहिती संशोधकांनी दिली आहे. तसेच ज्यांना या समस्येचा अगोदर कोणताही मागमूस देखील नाही त्यांना देखील कोविड-१९मध्ये मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते असे स्पष्ट केले आहे.
संशोधकांना आढळून आले की, कोविड-१९ ला कारणीभूत असलेला सार्स -कोव्ह -२ हा विषाणू या पूरक प्रणालीला अनेक प्रकारे धोका पोचवतो आणि ज्या रुग्णामध्ये ही जीवघेणी समस्या गंभीर रूप धारण करते तो रुग्ण ही पूरक प्रणाली सुरुवातीच्या टप्प्यातील संसर्गानंतर ही पूरक प्रणाली कार्यरत करण्यात अपयशी ठरतो. कोविड-१९ रुग्णांमध्ये जी पूरक प्रणालीची समस्या आढळून येते ती दुर्मिळ अनुवांशिक विकार असलेल्या रूग्णांसारखीच असते. या समस्यांमध्ये फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या धोकादायक गुठळ्या होऊ शकतात. इतर संशोधकांच्या गटाने अलीकडेच केलेल्या संशोधनानुसार असे देखील आढळून आले आहे की, कोविड-१९च्या काही रूग्णांमध्ये अनुवांशिक बदल दिसून आले आहेत ज्यामुळे त्यांना अनुवांशिक रोग नसतानादेखील पूरक प्रणालींमधील बिघाड धोकादायक ठरू शकतो.
“पूरक प्रणाली मित्र किंवा शत्रू असू शकते,” असे एमडी, पीएचडी असलेले वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापक अॅलफ्रेड किम सांगतात. “कोविड-१९चा सामना करताना संरक्षणात्मक प्रतिक्रियेमध्ये आणि रोगास प्रतिकार करण्याचे सामर्थ्य असणार्या व्यक्तीमध्ये नेमका काय फरक आहे हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. कदाचित हा एकमेव पर्याय नाही, परंतु अनियंत्रित पूरक प्रणाली सक्रिय करून गंभीर आजाराच्या रूग्णांमध्ये नेमकी काय चूक होत आहे हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे."
वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापक कॅथरीन लिस्झेव्स्की म्हणाल्या “या कोरोनाविषाणूमध्ये अशी यंत्रणा आहे जी पूरक प्रणालीवर मात करण्याची क्षमता बाळगते मात्र आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत. कदाचित असेही असू शकते की हा विषाणू ही पूरक प्रणाली हायजॅक करून आपले उद्दिष्ट साधत असेल. त्यामुळेच प्रणालीला पुन्हा कार्यरत करण्याचा युक्तिवाद येतो. पूरक प्रणालीने सुरुवातीला या विषाणूशी लढा द्यावा आणि त्याला रोखण्यात यश मिळवावे किंवा जर त्यात अपयश आले तर किमान शरीर त्याला ब्रेक लावू शकेल अशी प्रणाली विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे."