ETV Bharat / sukhibhava

Winter Care : थंडीमुळे ओठ फाटले आहेत? मग करा 'हे' घरगुती उपाय - Winter Care

आपल्याला नेहमी वाटते की, चेहऱ्याचे सौंदर्य वाढत राहावे. तर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यातही ओठांचा महत्त्वाचा वाटा असतो. म्हणूनच त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. फाटलेल्या ओठांच्या (Chapped lips) समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. चला तर याविषयी जाणून घेऊया...(Home Remedy For Dry Lips)

Chapped lips due to cold
थंडीमुळे ओठ फाटले आहेत?
author img

By

Published : Nov 17, 2022, 10:04 AM IST

हैदराबाद: हिवाळा येताच चेहऱ्याची चमक कमी होते. त्वचा कोरडी आणि निर्जीव होत असते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीचा परिणाम चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्वाधिक दिसून येतो. हिवाळ्यात, बहुतेक लोकांना फाटलेले ओठ आणि कोरड्या त्वचेचा त्रास होतो. फाटलेल्या ओठांच्या समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. चला तर याविषयी जाणून घेऊया...(Home Remedy For Dry Lips)

स्क्रब करा: टोमॅटोवर साखर टाका आणि नंतर हलक्या हाताने ओठ स्क्रब करा (Tomato-Sugar Scrub for Lips), असे केल्याने ओठांची डेड स्किन निघून जाईल आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून आराम मिळेल.

बदामाचे तेल: हिवाळ्यात झोपण्यापूर्वी दररोज ओठांना बदामाचे तेल लावा. ओठांना तेल लावल्यानंतर 5 मिनिटे मसाज करा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर क्रीम लावा: ब्युटी एक्सपर्टच्या मते, फाटलेल्या ओठांवर क्रीम्सही खूप प्रभावी असतात. तुम्ही रोज झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर क्रीम लावा आणि दोन मिनिटे ओठांना मसाज करा. यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल आणि ओठ मऊ होतील.

मधाचा वापर केला जाऊ शकतो: फाटलेल्या ओठांसाठी देखील मधाचा (Honey For Lips) वापर केला जाऊ शकतो. यामुळे ओठ मऊ होतात आणि वेदनांचा त्रासही कमी होतो. ओठांना भेगा पडल्या असतील तर तेही हे लावल्याने भरून निघते.

ओठांवर खोबरेल तेल लावा: फाटलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावल्यानेही फायदा होतो. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा ओठांवर खोबरेल तेल (Coconut Oil For Lips) लावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर याचा वापर करा. यामुळे त्वचा मऊ होईल आणि ओठांच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल.

हळद: जर तुमचे ओठांना रक्तस्राव होऊ लागला असेल तर एक चतुर्थांश चमचा दुधात २ चिमटी हळद मिसळून ओठांवर लावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे करा. कच्ची हळद बारीक करून वापरल्यास आणखी लवकर आराम मिळेल.

ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईल (Olive Oil For Lips) ही समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल ओठांवर लावा. असे केल्याने ओठ मऊ दिसतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.