ETV Bharat / sukhibhava

Chandra Grahan 2023 : जाणून घ्या कधी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण, कुठे दिसेल चंद्रग्रहण

author img

By

Published : Apr 10, 2023, 3:46 PM IST

Updated : May 5, 2023, 7:26 AM IST

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण पाच मेच्या रात्री दिसणार आहे. मात्र हे उपछाया चंद्रग्रहण असल्याने त्याचा सुतककाळ भारतात लागू होणार नाही.

Chandra Grahan 2023
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला होणार असून ते भारतात दिसणार नाही. मात्र सूर्यग्रहणानंतर वर्षातील पहिले चंद्रग्रहणही या वर्षात होणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी या घटनेला ज्योतिषशास्त्रातही मोठे महत्व आहे. पाच मेच्या दिवशी बौद्ध पौर्णिमा आणि चंद्रग्रहण या दोन्हीचा योगायोग येणार आहे.

कधी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण : वर्षातील पहिले सूर्यग्रहण या 20 एप्रिलला असल्याने नागरिकांना सूर्यग्रहणाबाबतची उत्सुकता लागली आहे. त्यासह नागरिक चंद्रग्रहण कधी आहे, याबाबतही उत्सुकतेने विचारत आहेत. अनेक नागरिकांना सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांचा आपल्या राशीवर परिणाम होत असल्यावर प्रचंड विश्वास वाटतो. त्यामुळे नागरिक त्याविषयी मोठ्या उत्सुकतेने माहिती शोधत आहेत. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मेच्या दिवशी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशीच होणार आहे. त्यामुळे 5 मेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री 08.45 मिनीटाला सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी अर्थात 6 मेला सकाळी 01.00 वाजता या चंद्रग्रहणांची सांगता होणार आहे.

भारतात सुतककाळ नाही होणार लागू : वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिलला दिसणार असले, तरी ते भारतीयांना पाहता येणार नाही. त्यामुळे भारतीयांना सूर्यग्रहणाचा सुतककाळ लागू होणार नाही. अगदी तसाच प्रकार चंद्रग्रहणाच्या बाबतीही लागू होणार आहे. चंद्रग्रहण हे उपछाया ग्रहण असल्याने त्याचा सुतककाळ भारतात लागू होणार नसल्याचे मत ज्योतिषशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतीयांना सुतककाळ पाळण्याची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बौद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योगायोग : यावर्षी पाच मेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसणार असले, तरी या तारखेला अनेक योगायोग येत आहेत. बौद्ध पौर्णिंमेला बौद्ध बांधव अतिशय पवित्र मानून या दिवशी गौतम बुद्धाची वंदना करतात. बौद्ध बांधव या दिवशी विहारात जाऊन विविध कार्यक्रमाचे आयोजनही करतात. मात्र दुसरीकडे या दिवशी चंद्रग्रहण येत असल्याने हा दुर्मिळ योगायोग मानण्यात येत आहे.

हेही वाचा - Surya Grahan 2023 : 'या' दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या सुतक काळासह कुठे आणि कधी दिसणार ग्रहण

Last Updated : May 5, 2023, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.