ETV Bharat / sukhibhava

ब्रिस्क वॉक लठ्ठपणा, मधुमेहाचा धोका टाळू शकते; 'या' आजरांवरही फायदेशीर.. वाचा काय आहे ते?

चालने हे आरोग्यासाठी फायदेशीर समजल्या जाते, मात्र तज्ज्ञांचे मत आणि अनेक संशोधनांच्या परिणामांनी हे सिद्ध केले आहे की, ब्रिस्क वॉकिंग (Brisk walk), सामान्य वॉकिंगच्या तुलनेत आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. ब्रिस्क वॉकिंगचे काय फायदे आहेत? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

Walk
वॉक
author img

By

Published : Nov 14, 2021, 6:00 PM IST

Updated : Nov 14, 2021, 10:47 PM IST

ब्रिस्क वॉकबाबत अमेरिकन जर्नल (American Journal) मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, या प्रकारच्या वॉकने शरीरात आनंद वाढवणारे हार्मोन्स तयार होतात ज्याने मन तर आनंदी राहातेच, त्याचबरोबर ताण किंवा चिंता म्हणजेच, एंग्जायटी (Anxiety) पासून देखील बचाव होऊ शकतो.

ब्रिस्क वॉकिंग (Brisk walking) केवळ मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर, शारीरिक आरोग्यासाठी देखील फायद्याचे असते. याबाबत करण्यात आलेल्या विविध संशोधनांचे परिणाम सांगतात की, रोज ब्रिस्क वॉक करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा (Obesity), हृदयरोग (Heart disease), चयापचयसंबंधी विकार (Metabolic disorders), मज्जा संस्था आणि मेंदू संबंधी विकार, त्याचबरोबर मधुमेहसह (diabetes) इतर अनेक रोग होण्याचा धोका कमी असतो.

काय आहे ब्रिस्क वॉकिंग?

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानुसार (CDC) मध्यम तीव्रतेची किंवा वेगवान हालचाल ज्यात व्यक्तीला घाम फुटतो आणि त्याची हृदय गती वाढते त्यास ब्रिस्क वॉक (Brisk walk) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, धावणे आणि चालणे यामधील स्थितीला ब्रिस्क वॉक म्हणतात. या विशेष वॉकमध्ये एका व्यक्तीला वेगाने चालण्यासाठी 4.5 मैल प्रतितासाच्या कमाल वेगाने पुढे जाण्याची आवश्यकता असते.

ब्रिस्क वॉकिंगचे (Brisk walking) फायदे

2017 मध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, वेगाने चालणे लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते, यासोबतच ते लोकांच्या शारीरिक व मानसिक हालचालींची पातळी वाढवण्यासही मदत करते. अहवालात लेखकांनी परिणामांच्या आधारावर दावा केला होता की, दररोज 10 मिनिटे वेगाने आणि कमीत कमी 3 मैल प्रति तास वेगाने चालल्यास अधिक आरोग्य लाभ दिसू शकते. तेच 2018 मधील एका आभ्यासाने 50 हजारपेक्षा अधिक इंग्रजी आणि स्कॉटिश वॉक करणाऱ्यांच्या सर्व्हेक्षणाच्या आकड्यांना एकत्र केले आणि लोकांच्या आरोग्यावर त्यांच्या चालण्याच्या वेगाचा प्रभाव तपासला, ज्यामधून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, हळू चालणाऱ्यांच्या तुलनेत सरासरी किंवा वेगाने चालणाऱ्यांमध्ये सर्व कारणांनी किंवा हृदय रोगाने मृत्यूचा धोका कमी होण्याची शक्यता अधिक असते.

ब्रिस्क वॉकिंगने ब्रेन हेल्थला देखील फायदा होऊ शकतो. 2014 च्या एका आभ्यासाने निष्कर्ष काढला की, सहा महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोन वेळा वेगाने चालल्याने अशा वृद्ध महिलांमध्ये हिप्पोकॅम्पसच्या प्रमाणात वाढ दिसून आली, ज्यांमध्ये सौम्य संज्ञानात्मक कमजोरीचे लक्षण दिसून येत होते. परंतु, संशोधकांनी या निष्कर्षाचे समर्थन करण्यासाठी अधिक शोध करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.

ब्रिस्क वॉक करण्याचे काही लोकप्रिय फायदे खालीलप्रमाणे आहेत

- ब्रिस्क वॉक (brisk walk benefits) केल्याने शरीरात रक्ताभिसरण वेगाने वाढते ज्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि इतर आवश्यक पोषक तत्व चांगल्या प्रकारे पोहोचतात.

- नाइजेरियन जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, रोज वॉकिंग केल्याने चयापचय (metabolism) क्रिया सुरळीतरित्या काम करते. त्याचबरोबर, मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो. जर तुम्ही आठवड्यातून 5 दिवस ब्रिस्क वॉक केला तर, तुमचे वजन वेगाने कमी होईल, त्यासोबतच तुम्ही अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकता. जर तुम्ही रोज जवळजवळ 30 मिनिटांपर्यंत ब्रिस्क वॉक केला तर तुमची चयापचय क्रिया वेगाने काम करते, ज्याने तुम्ही जवळपास 150 कॅलरी (calorie) बर्न करू शकता.

- 2017 च्या एका अहवालानुसार, दिवसातून 10 मिनिटे वेगाने चालल्याने शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आणि लठ्ठ लोकांना मध्यम वजनापर्यंत पोहोचण्यात मदत मिळू शकते. मात्र, संशोधनात असे देखील सांगण्यात आले आहे की, केवळ वेगाने चालल्याने वजन घटण्यात मदत मिळत नाही. जर एक व्यक्ती आपले वजन कमी करू इच्छित असेल तर, त्याला त्याच्या दैनंदिन आहारातील निवडी आणि कॅलरी सेवनावरही विचार करणे गरजेचे आहे.

- जर तुम्ही आठवड्यातून 5 वेळा ब्रिस्क वॉक केला तर, तो मधुमेहाच्या धोक्याला 12 टक्क्यांपर्यंत कमी करतो.

- एका संशोधनानुसार, जे आठवड्यातून 15 ते 16 किलोमीटरपर्यंत ब्रिस्क वॉक करतात त्यांना हृदयसंबंधी आजार होण्याचा धोका 35 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

- ब्रिस्क वॉक केल्याने तुमच्या धमन्या चांगल्या प्रकारे अरुंद होतात आणि पसरतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहाते आणि रक्तदाब नियंत्रणात राहातो.

- जेव्हा तुम्ही ब्रिस्क वॉक करता तेव्हा तुमच्या हाडांवर ताण पडतो ज्यामुळे हाडांना आवश्यक खनिजे (minerals) मिळतात आणि हाडे मजबूत (strong bones) होतात.

वेगाने चालणे आणि इतर क्रियाकलापांमुळे बर्न (calorie burn) होणाऱ्या कॅलरीचा डेटा

वेगाने चालून बर्न केलेली कॅलरी व्यक्तीचे वजन आणि इतर कारकांच्या आधारावर विविध असू शकते. त्याचप्रकारे विविध क्रियाकलापांमध्ये विविध प्रमाणात कॅलरी बर्न होऊ शकते. मेडिकल न्यूज टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, विविध क्रियाकलापांमध्ये प्रतितास बर्न होणाऱ्या सरासरी कॅलरीचे प्रमाणे पुढील प्रमाणे आहे,

3.5 मैल प्रति तास चालणे - 280 (कॅलरी)

4.5 मैल प्रति तास चालणे - 460 (कॅलरी)

धावणे किंवा जॉगिंग करणे - 590 (कॅलरी)

एरोबिक्स - 480 (कॅलरी)

वजन उचलणे (हलका व्यायाम) - 220 (कॅलरी)

सायकल चालविणे (10 मैल प्रति तासापेक्ष आधिक) - 590 (कॅलरी)

पोहणे (मंद फ्रीस्टाईल लॅप) - 510 (कॅलरी)

हेही वाचा - 'या' प्राण्याची नॅनोबॉडी कोविड - 19 विरोधात ठरू शकते प्रभावी, संशोधनातून समोर

Last Updated : Nov 14, 2021, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.