ETV Bharat / sukhibhava

स्तनपान करणं अवघड जातं? 'ही' उत्पादनं ठरू शकतात फायदेशीर

बऱ्याचदा पहिल्यांदा आई झालेल्या महिला आणि कुण्या समस्येशी प्रभावित असलेल्या महिलांना बालकांना प्राकृतिक म्हणजेच, कुठल्याही बाहेरील मदतीविना दूध पाजताना समस्येचा सामना करावा लागतो. अशात काही वस्तू महिलांना स्तनपानासाठी मदत करू शकतात.

author img

By

Published : Aug 2, 2021, 5:42 PM IST

Updated : Aug 2, 2021, 7:22 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मातृत्व हे नेहमी सोपे नसते. सामान्यत: मातांसाठी हा प्रवास सोपा असतो, मात्र बरेचदा काही विविध कारणांमुळे काही मातांना विशेषतः स्तनपान करताना अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक समस्या, अनुभवाची कमतरता आणि आसपासच्या परिस्थितीमुळे उत्पन्न झालेल्या या समस्या टाळण्यासाठी काही उत्पादने महिलांना खूप मदत करू शकतात. ते पुढील प्रमाणे आहेत,

ब्रेस्ट पंप

Breastfeeding products information
ब्रेस्ट पंप

बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यापर्यंत त्याला आईचे दूध आवश्यक असते, हे सर्वांना माहिती आहे. देहरादून येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. लतिका जोशी सांगतात की, ज्या बाळांना जन्मानंतर लगेच स्तनपान केले जाते, ते शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतात. त्याचबरोबर, त्यांचे मानसिक क्षमतेचा विकासही चांगल्या प्रकारे होते. मात्र, काम करणाऱ्या महिलांना बाळाला गरज असेल तेव्हा प्रत्येकवेळी स्तनपान करणे कठीण जाऊ शकते, अशात हे स्तनपानसंबंधी उत्पादन त्यांना मदत करू शकतात. ब्रेस्ट पंपच्या माध्यमातून माता आपले दूध काढून एका निश्चित काळासाठी फ्रिज किंवा अन्य ठिकाणी सुरक्षित ठेवू शकते. मात्र, येथे एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे, मातेच्या दुधाला एका ठराविक काळापर्यंतच सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच, या दुधाला गॅस किंवा माईक्रोवेव्हमध्ये गरम करू नये, यामुळे दुधातील पौष्टिक तत्व नष्ट होतात.

ब्रेस्ट मिल्क स्टोरेज बॅग

Breastfeeding products information
ब्रेस्ट मिल्क स्टोरेज बॅग

मुलांना सांभाळण्यासोबतच घराचे आणि ऑफिसचे काम करणे एका मातेसाठी कठीण असते. विशेषतः अशा मातांना ज्यांना बाळाला स्तनपान देखील करावे लागते. अशात ब्रेस्ट मिल्क स्टोरेज बॅग खूप मदत करू शकते. माता आपले दूध या बॅगमध्ये एकत्रित करू शकते आणि आवश्यकता पडल्यास किंवा सार्वजनिक स्थळावर स्तनपान करण्याऐवजी या बॅगने बाळाला दूध पाजू शकते.

ब्रेस्ट पॅड

Breastfeeding products information
ब्रेस्ट पॅड

स्तनपान करणाऱ्या महिलांच्या स्तनांमधून सतत गळतीची समस्या देखील दिसून येते. हे एक सामान्य बाब आहे. मात्र, यामुळे अनेकदा महिलांना संकोच आणि अस्वस्थतेला समोर जावे लागू शकते. कारण स्तनांतून गळणाऱ्या दुधामुळे कपडे खराब होऊ शकतात. मातेच्या स्तनांतून अधिक प्रमाणात गळणाऱ्या दुधामुळे कपडे खराब होऊ नये, यासाठी ब्रेस्ट पॅड खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला फक्त ब्रेस्ट पॅड तुमच्या ब्राच्या कपमध्ये ठेवायचे आहे. ते दूध शोषून घेते आणि तुमच्या कपड्यांवर डाग लागू देत नाही.

निप्पल शिल्ड

बऱ्याचदा मातेच्या निप्पलचे आकार किंवा त्यात भेगा पडण्यासारख्या समस्येमुळे मुलाला प्राकृतिक पद्धतीने दूध पाजताना मातेला वेदना किंवा अन्य समस्या होऊ शकतात. अशात चिकित्सक निप्पल शिल्डचे वापर करण्याचा सल्ला देतात. निप्पल शिल्ड हे पतल्या सिलिकॉन कवर सारखा असतो, ज्याला स्तनपानदरम्यान निप्पल आणि एरिओलाच्या (areola) वर घातले जाते.

नर्सिंग पिलो किंवा ब्रेस्टफीडिंग पिलो (उशी)

Breastfeeding products information
ब्रेस्टफीडिंग पिलो (उशी)

स्तनपान करताना नर्सिंग पिलो मोठे सोयिस्कर ठरू शकते. सामान्यत: महिलांना प्रसुतीनंतर स्तनपान करताना सरळ बसून आणि झुकून दूध पाजायला अडचण होते. अशात नर्सिंग पिलो किंवा ज्याला ब्रेस्टफीडिंग पिलो देखील म्हणतात ते खूप उपयुक्त ठरते. बाळाला ब्रेस्टफीडिंग पिलोवर ठेवल्याने मातेला स्तनपान करणे सोपे होते. इतकेच नव्हे तर, ते मातेच्या कमरेलाही आधार देते, ज्यामुळे मातेला बसताना आणि हाताच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

स्वच्छता आवश्यक

डॉ. लतिका जोशी सांगतात की, फक्त मुलेच नव्हे तर, मातेच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या वस्तू स्वच्छ असणे गरजेचे आहे, मग तो कुठल्याही प्रकारचा कापड, सामान किंवा ब्रेस्ट मिल्क पंप असो. जर कुणी महिला पंपचा वापर करत असेल तर वापरापूर्वी आणि त्यानंतर त्याची स्वच्छता गरम पाण्याने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, ब्रेस्ट पॅडचा उपयोग करताना देखील सुरक्षेच्या बाबी अवलंबने गरजेचे आहे. जसे, ओले ब्रेस्ट पॅड लवकर हटवावे. ओल्या पॅडमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.

हेही वाचा - रात्री उशिरा खाणे टाळा, होऊ शकतात 'या' समस्या

Last Updated : Aug 2, 2021, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.