ETV Bharat / sukhibhava

Benefits of Papaya Seeds : पपईच्या बिया आहेत खूप आरोग्यादायी; जाणून घ्या काय आहेत फायदे.... - पपई फळ आणि भाजी

Benefits of Papaya Seeds : निरोगी राहण्यासाठी लोक फळे आणि भाज्या खातात. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. या पौष्टिक गोष्टींमध्ये पपईचा समावेश होतो. पपई फळ आणि भाजी या दोन्ही रूपात खाल्ली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का पपईच्या बिया आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. वाचा तर मग...

Benefits of Papaya Seeds
पपईच्या बिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 1:26 PM IST

हैदराबाद : Benefits of Papaya Seeds पपई हे पौष्टिक घटकांनीयुक्त फळ आहे. पपई सुपरफूड म्हणून ओळखली जाते. तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज पपई खाण्याचा सल्ला दिला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का, पपईच्या छोट्याशा काळ्या बिया देखील अनेक गुणधर्मांनी समृद्ध असतात. अनेकदा लोक या बियांना निरुपयोगी समजून फेकून देतात. परंतु ह्या बिया आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि झिंक, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक या बियांमध्ये आढळतात. याशिवाय या बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. जाणून घेऊया पपईच्या बियांचे फायदे...

  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते : पपईच्या बियांमध्ये असलेले फायबर शरीरातील कोलेस्टेरॉल योग्य प्रमाणात आणण्यास मदत करते (benefits of papaya seeds cholesterol). याशिवाय या बियांमध्ये ओलिक अ‍ॅसिड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.
  • आतड्यांच्या आरोग्यास फायदेशीर : पपईच्या बियांमध्ये कार्पेन असते, जे पचन सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते. या लहान बियांमध्ये असलेले पॅपेन आणि chymopapain सारखे एन्झाइम्स आढळतात, जे पचनास मदत करतात. यामुळे सूज येणे, गॅसची लक्षणे देखील कमी होतात (benefits of papaya seeds intestinal health).
  • रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर : पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-सी देखील भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. व्हिटॅमिन सी शरीराला अनेक आजारांपासून वाचवते.
  • त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : पपईच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. या बिया केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त आहेत. तुम्ही त्वचा आणि केसांसाठी पपईच्या बियांचा अर्क किंवा तेल वापरू शकता.
  • लिव्हरसाठी फायदेशीर : पपईच्या बियांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे अन्न विषबाधाची समस्या दूर होऊ शकते. पपईच्या बियांमध्ये असलेले फायबर पोटाच्या समस्याही दूर करते. पपईच्या बियांची पावडर यकृतासाठीही फायदेशीर आहे.

अशा प्रकारे पपईच्या बिया वापरा : तुम्ही पपईच्या बिया स्मूदीज, ज्यूस, ओटमील यामध्ये मिसळून खाऊ शकता किंवा सकाळी एक ग्लास पाण्यासोबत या बियांचे सेवन करू शकता. पपईच्या बिया वापरण्यासाठी तुम्ही त्यांना वाळवून पावडर बनवू शकता.

हेही वाचा :

  1. Benefits of Capsicum : सिमला मिरची आहे आरोग्याचा खजिना; जाणून घ्या काय आहेत आरोग्यदायी फायदे...
  2. Health Benefits of Guava : पावसाळ्यात पेरू खाणे आहे आरोग्यदायक; जाणून घ्या काय आहेत फायदे....
  3. Eyelash Growing Tips : तुम्हालाही आवडतात का लांब पापण्या? जाणून घ्या काही टिप्स...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.