जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे या वर्षी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठवड्यात 35 ते 40 तास काम करण्याच्या तुलनेत 55 किंवा त्यापेक्षा अधिक तास काम करण्याचा इस्केमिक हृदय रोगाद्वारे मृत्यू होण्याच्या 17 टक्के अधिक धोक्याशी संबंध आहे. त्यामुळे, तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो.
जयपूर येथील वरिष्ठ इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट राहुल सिंघल सांगतात की, रेस्टिंग हार्ट रेट (RHR) हे आपल्या वर्तमान आणि भविष्यातील आरोग्याचे महत्त्वपूर्ण सूचक आहे, जर त्याची व्यवस्थितरित्या नोंद केली तर, लवकर विकृती ओळखता येऊ शकते. तुमची रेस्टिंग हार्ट रेट मोजण्याची प्रकिया खूप सोपी आहे. आपल्या नाडीवर दोन बोटे 60 सेकेंदांसाठी ठेवा आणि हृदयाचे ठोके मोजा.
पल्स रेट आठवड्यातील कुठल्याही दिवशी मोजता येऊ शकते, मात्र त्याची नोंद घेताना तुम्ही तणाव किंवा चिंताग्रस्त होऊ नये कारण, या स्थितीत हार्ट रेट वाढते. खूप क्रियाकलापानंतर हे करण्यासाठी कमीतकमी पाच ते दहा मिनिटे थांबावे. पल्स रेट तपासणी सकाळी करणे चांगले राहाते.
सामान्यत: हार्ट रेट हे 60 ते 100 दरम्यान असते, परंतु जर ते 60 सेकंदांच्या पल्स रिडिंगमध्ये 80 च्या वर असेल तर, तुम्हाला उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि कार्डिओव्हास्क्यूलर हे रोग होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. जर ते 90 च्या वर असेल तर, हे रोग होण्याचा धोका तीन पटीने वाढतो. 70 आणि 80 दरम्यान हार्ट रेट हे आदर्श रेस्टिंग हार्ट रेट आहे, असे तज्ज्ञ मानतात. उच्च रेस्टिंग हार्ट रेट म्हणजे कमी शारीरिक तंदुरुस्ती असे, राहुल सिंघल म्हणाले.
60 आणि 100 दरम्यान असणारा हार्ट रेट सामान्य आहे, परंतु 80 च्यावर असलेला हार्ट रेट हाय रेस्टिंग मानला जातो. ते कमी शारीरिक तंदुरुस्ती, अधिक वजन किंवा चरबी किंवा रक्तदाब दर्शवते. रुग्णाचा रेस्टिंग हार्ट रेट जितका अधिक असेल, तितकेच त्याला हृदय रोग किंवा अकाली मृत्यूचा धोका अधिक असतो. याचे कारण असे की, जितका जास्त हर्ट रेट असेल हृदयालाही तितकेच पम्पिंग करावे लागते.
व्यायामाच्या वेळी हार्ट रेट वाढणे हे चांगले जरी असले, तरी ते हाय रेस्टिंग हार्ट रेटच्या वेळी बरोबर नाही. कारण, विश्रांती घेत असताना, पल्स रिडिंग खूप अधिक नसावी, अथवा ते आपल्या हृदयांच्या स्नायू दबावाखाली असल्याचे सूचित करते.
किमान दर 2 तासांनी विश्रांतीसाठी 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्या
सध्या कोविड - 19 च्या काळात बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली. मात्र, ऑफिसच्या तुलनेत कर्मचारी घरी जास्त तास काम करत आहेत. त्याच संदर्भात, हैदराबाद येथील व्हीआयएनएन रुग्णालयातील सल्लागार फिजिशियन, एमडी (जनरल मेडिसीन), डॉ. राजेश वुक्कला सांगतात की, जर तुम्ही जास्त तास काम करत असाल तर, किमान दर 2 तासांनी विश्रांतीसाठी 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्या. हे मेंदूला अधिक लक्षपूर्वक, अधिक कार्यक्षमतेने आणि एकाग्रतेने कार्य करण्यास मदत करेल. बरेच लोक असे करत नाही, त्यामुळे मेंदूचे कार्य प्रभावित होते, थकवा आणि मानसिक तणाव निर्माण होतो.
डॉ. वुक्कला पुढे सांगतात की, उच्च रेस्ट हार्ट रेटमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, तसेच इस्केमिक हृदयरोगाचे प्रमाणही अधिक आहे. कामाचे मोठे ताण आणि कमी आराम यामुळे शरीरात अधिक स्ट्रेस हार्मोन्स सोडली जातात. स्ट्रेस हार्मोन्स अप्रत्यक्षपणे उच्च रक्तदाबावर परिणाम करतात, मधुमेहावर नियंत्रण ठेवतात, झोपेची कमतरता निर्माण होते आणि शरीरात इन्फ्लामेटोरी रेस्पॉन्स वाढवते. उच्च ताण असलेल्या लोकांकडे उच्च संवेदनशील सी रिअॅक्टिव्ह प्रोटीन (hs-CRP) असेल, ज्यामुळे इस्केमिक हृदयरोग होऊ शकतो, परिणामी हृदयविकाराचा झटका येईल, जे चिंताजनक आहे.
उच्च दाबामुळे हृदयाचे स्नायूंना ताण येतो, ज्यामुळे रुग्णाला या सर्व समस्या होऊ शकतात. जीवनशैली सुधारून, ध्यान आणि योगाने हाय रेस्टिंग हार्ट रेट स्थिर होऊ शकतो. शिवाय, तणाव हा एक सायलेंट किलर आहे, जो तुमचा हार्ट रेट खूप वाढवू शकतो. काही आभ्यासांमध्ये रुग्णांनी जीवनशैलीत बदल घडवून एका आठवड्यात हाय रेस्टिंग हर्ट रेट सामान्यही केले आहे.
हेही वाचा - सकाळी रिकाम्या पोटी चहा - कॉफी ऐवजी 'हे' प्या, तज्ज्ञांचा सल्ला