ETV Bharat / sukhibhava

Babasaheb Ambedkar Jayanti 2023 : जगात गाजावाजा ; जाणून घ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास - बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सगळ्याच क्षेत्रात अफाट कार्य केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 14 एप्रिल या जयंतीनिमित्त जगभरात जल्लोष साजरा करण्यात येतो.

Babasaheb Ambedkar Jayanti 2023
बाबासाहेब आंबेडक यांचे संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 8, 2023, 2:17 PM IST

Updated : Apr 14, 2023, 6:05 AM IST

हैदराबाद : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दलितोद्धारक असे म्हटले जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गुलामीच्या जोखडातून मुक्त केले. त्यामुळे भारतासह परदेशातही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येते. इतकेच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच साजरी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्यप्रदेशातील महू येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यामुळे जाणून घेऊया डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास.

बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे 14 एप्रिल 1891 ला रामजी सकपाळ आणि भिमाईच्या पोटी झाला. रामजी सकपाळ यांचे मूळ गाव हे कोकणातील आंबडवे होते. मात्र रामजींनी पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण करुन ब्रिटीश सैन्यात नोकरी पत्करली होती. त्यांना महू या ब्रिटीशांच्या सैन्य मुख्यालयाच्या ठिकाणी नोकरीनिमित्त जावे लागले. त्यामुळे बाबासाहेबांच्या लहानपणीची जडणघडण महू येथील छावणीच्या सैन्य शिस्तीतच झाली.

काय आहे बाबासाहेबांच्या आडनावाचा इतिहास : सुभेदार रामजी सकपाळ हे सैन्यात नोकरीला होते. मात्र त्यांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे हे होते. त्यामुळे सुभेदार रामजी सकपाळ यांनी सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचे नाव लिहिताना भिमराव आंबावडेकर असे लिहिल्याची नोंद 7 नोव्हेंबर 1900 ला करण्यात आली आहे. मात्र पुढे याच शाळेच शिकताना बाबासाहेबांनी आपली चुणूक दाखवली. त्यामुळे ते सगळ्या शिक्षकांचे लाडके विद्यार्थी म्हणून नावारुपास आले. मात्र त्यांचे आंबावडेकर नाव घेण्यास शिक्षकांना अडचण होत असल्याने कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी त्यांचे नाव आंबेडकर असे नोंदवले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच नाव पुढे कायम करत आपले नाव जगभर गाजवले.

बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अपाट कार्य केले आहे. त्यांचे कार्य एका लेखात समाविष्ट करणे शक्य नसले, तरी त्यातील महत्वाच्या कार्यावर या लेखात प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यातील चवदार तळे पाण्याचा सत्याग्रह हा महत्वाचा मानला जातो. महाड येथील चवदार तळ्यावर जनावरांना पाणी पिण्सास मुभा होती, मात्र दलितांना या चवदार तळ्याचे पाणी पिता येत नव्हते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ला चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन दलितांना हे तळे पाणी पिण्यासाठी खुले करुन दिले. या दिवसाला महाराष्ट्र शासनाने सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यासह नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह करुन त्यांनी दलितांना हे मंदिर खुले करुन दिले. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्यामुळे त्यांना सामाजिक सुधारणांचे शिल्पकार असे म्हणतात.

बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्य : डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांनी भारताची राज्यघटना लिहिल्याने त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतच अनेक सुधारणा करुन ठेवल्या आहेत. दलितांना आरक्षण, दलितांना शिक्षण, यासारख्या सगळ्यांना सामाजिक समतेने वागणूक देण्याची तरतूद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत करुन ठेवली आहे. आजही भारताची राज्यघटना सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करते. देशभरात दलित आणि मागासवर्गीय समाजांच्या सुधारणांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध योजनांची तरतूद केली आहे. दलितांना समतेने वागवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळ्या मतदार संघाचीही मागणी केली होती. मात्र महात्मा गांधींजींसोबत केलेल्या पुणे करारामुळे त्यांना ही मागणी मागे घ्यावी लागली. त्यामुळे भारतीय समाज सुधारणेत बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आदर्श घालून दिले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 14 एप्रिलला जगभरात भीम जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येते.

हेही वाचा - Easter Sunday 2023 : प्रभू येशूंचा पुनर्जन्म झाल्याचा दिवस म्हणून साजरा करतात ईस्टर संडे; जाणून घ्या ईस्टर संडेचा इतिहास

Last Updated : Apr 14, 2023, 6:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.