अर्जुन वृक्षाच्या सालीला अनेक आजारांच्या उपचारावर फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदाचे तज्ज्ञ सांगतात की, अर्जुन वृक्षाच्या सालीतील औषधीय गुण वजन कमी करणे, त्वचेला सुंदर बनवणे आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच, ही साल हृदय रोग आणि कॅन्सरसारख्या आजरांवर देखील फायदेशीर ठरते. अर्जुन वृक्षाचे फायदे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' हैदराबाद येथील आयुर्वेदिक आणि तज्ज्ञ डॉक्टर पी.वी रंगनायकुलू यांच्याशी बातचीत केली.
डॉ.पी.वी. रंगनायकुलू सांगतात की, अर्जुन वृक्षाची साल हृदय रोग, क्षय, पित्त, कफ, सर्दी, खोकला, अत्याधिक कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणासारखे आजार दूर करण्यास मदत करते. उल्लेखनीय म्हणजे, अर्जुन वृक्ष भारतातील हिमालयाच्या तराई, उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. आणि त्यात बीटा-साइटोस्टेरॉल, एलाजिक अॅसिड, ट्रायहायड्रॉक्सी ट्राईटरपीन, मोनो कार्बोक्झिलिक अॅसिड, अर्जुनिक अॅसिड आढळतात.
अर्जुन वृक्षाच्या सालीचे सेवन केल्याने होणारे फायदे
1) अर्जुन वृक्षाची साल कॅन्सरची वाढ थांबवण्यास मदत करते
या प्रकरणी केंद्रीय औषदी आणि सुगंधी वनस्पती संस्था (सीआयएमएपी), लखनऊ येथे झालेल्या एका संशोधनात असे समोर आले की, अर्जुन वृक्षाच्या सालीमध्ये एक असे संयुग (compound) आढळते ज्यात कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमता आहे. त्याचे नाव अर्जुनिक अॅसिड असे ठेवण्यात आले आहे. ते ओरल आणि ओवरीच्या कॅन्सरवर फायदेशीर आहे. तसेच, या संदर्भात झालेल्या इतर काही संशोधनाच्या निकालांनुसार, अर्जुनाच्या झाडात कॅसुआरीनिन (Casuarinin) नावचे रासायनिक घटक देखील आढळते. या घटकामुळे कॅन्सरच्या पेशींना शरीरात पसरता येत नाही.
2) हृदय रुग्णांसाठी रामबाण औषधी
डॉ. पी.वी. रंगनायकुलू सांगतात की, अर्जुनची साल ही हृदय रोगींसाठी खूप लाभकारी असते. याच्या नियमित सेवनाने धमन्यांमध्ये जमा होणारे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी होते. ज्यामुळे हृदयाला रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या सुरळीत काम करू लागतात आणि हृदयरोगापासून बचाव होतो.
3) मधुमहेच्या रुग्णांसाठी फायदेशीर
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील अर्जुन वृक्षाची साल खूप मदत करते. याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होते.
4) लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यात उपयुक्त
अर्जुनच्या सालीचा काढा पिल्याने पचनसंस्था चांगली राहते, ज्यामुळे लठ्ठपणा होत नाही. सालमधील लिपिड फॅट आणि चांगले कोलेस्टेरॉलचे गुण वजन कमी करण्यात मदत करू शकतात. अर्जुन वृक्षाची साल आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते, ज्यामुळे सर्दी, खोकल्या सारखे आजार होण्याची शक्यता कमी होते.
5) तोंड येणे बरे होण्यास मदत होऊ शकते
अर्जुनच्या सालीचा काढा सेवन केल्याने पचनसंस्था चांगली राहते. त्याचबरोबर, त्याच्या सेवनाने तोंड येण्यापासून बचाव होण्यास मदत होऊ शकते.
6 ) कानाच्या दुखन्याला बरे करते
अर्जुनच्या सालीमधील (antimicrobial) प्रतिजैविक कान दुखी आणि कानातील संसर्ग झाल्यास त्यापासून आराम देऊ शकतो.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय अर्जुन वृक्षाच्या सालीचे सेवन करू नये, असा सल्ला डॉ.पी.वी रंगनायकुलू यांनी दिला.