ETV Bharat / sukhibhava

Tips for your child : तुमची मुले अभ्यासकडे दुर्लक्ष करत आहेत? मग फाॅलो करा 'या' टिप्स

आपण जो अभ्यास (Study) करत आहोत तो विषय समजून घेऊन, त्याविषयीची आवड निर्माण झाली पाहिजे. तसेच त्यांना एखादा खेळ आवडत असेल तर त्या खेळाचा कधीच कंटाळा येत नाही. मग, अभ्यासाचाच कंटाळा का येतो? तर अभ्यासाची गोडी लागावी म्हणून आपण पालक म्हणून सुरुवातीपासूनच काही गोष्टी करायला हव्यात.

Are your kids neglecting their studies
तुमची मुले अभ्यासकडे दुर्लक्ष करत आहेत?
author img

By

Published : Nov 2, 2022, 4:55 PM IST

आपण जो अभ्यास (Study) करत आहोत तो विषय समजून घेऊन, त्याविषयीची आवड निर्माण झाली पाहिजे. मुलांना ज्या गोष्टी आवडतात, जे विषय आवडतात, त्याचा अभ्यास त्यांच्याकडून पटकन आणि छान होतो. तसेच त्यांना एखादा खेळ आवडत असेल तर त्या खेळाचा कधीच कंटाळा येत नाही. मग, अभ्यासाचाच कंटाळा का येतो? तर अभ्यासाची गोडी लागावी म्हणून आपण पालक म्हणून सुरुवातीपासूनच काही गोष्टी करायला हव्यात. (Take care of your children)

१. अॅक्टीव्हीटीज घ्यायला हव्यात: लिखाणासाठी मुलांच्या बोटांची पकड वाढवण्याच्या अॅक्टीव्हीटीज (Activities for children) घ्यायला हव्यात. यासाठी खोडरबरने खोडणे, मणी ओवणे, कात्रीने कागद कापणे, लहान वस्तू निवडणे असे केल्यास फायदा होतो. मात्र मूल खूप लहान असताना त्याला लिखाणाचा आग्रह करु नका.

२. एका जागी बसण्याची सवय लावावी: मुले लहान असल्यापासूनच म्हणजे अगदी ४ वर्षांपासूनच त्यांच्या बरोबर पाटी पेन्सिल घेऊन चित्र काढणे, गोष्टी सांगणे, एखाद्या विषयाची त्यांच्या वयानुसार ओळख करून देणे ह्या गोष्टी पालकांनी करायला हव्यात. म्हणजे मुलांना ऐकण्याची, एका जागी बसण्याची सवय लागेल.

३. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणेही महत्त्वाचे: अभ्यास घेताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणेही महत्त्वाचे आहे. यामध्ये कधी गोष्टी सांगून, कधी चित्रांच्या माध्यमातून कधी हातवारे करुन एखादा विषय समजावून देऊ शकता. विषयानुसार, मुलाच्या वयानुसार पद्धतीचा वापर केलात तर मुलांना नवीन विषय शिकायला कंटाळा येणार नाही. मूल थोडे मोठे असेल तर प्रश्नमंजुषेसारखे खेळ खेळून मुलांचा अभ्यास घेता येतो. वेगवेगळी उदाहरणं देऊन, गाणी म्हणून, इतिहासातले प्रसंग रंगून सांगून, नाट्यमय पद्धतीने मुलांना विषय समजावून सांगितला तर मुलांचे मनोरंजन पण होईल आणि अभ्यासही होईल.

४. महत्त्व पटवून द्यायला हवे: मुले एक विशिष्ट वेळ ठरवून सुद्धा अभ्यासाला बसायला टाळाटाळ करत असतील तर पालकांनी मुलांशी सकारात्मक संवाद साधून त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. अभ्यासाची वेळ मुलाला विचारून ठरवा. खूपदा पालकांनी सांगिलेल्या वेळेस मुलांना अभ्यास करायचा नसतो मग मुले वेगवेगळी कारण देतात. अशावेळेस पालकांनी मुलांना अभ्यास नक्की किती वाजता किंवा काय केल्यानंतर करणार आहेत हे विचारुन ठरवलं तर वाद होणार नाहीत.

५. योग्य पद्धतीने समजावून सांगायला हवे: मुलांना अभ्यास हा स्वतःसाठी आहे हे अतिशय योग्य पद्धतीने समजावून सांगायला हवे. मूल जास्त काळ एका जागी बसावं यासाठी योगा, बसून करण्याच्या काही अॅक्टीव्हीटीज घेऊन मुलांची बैठक वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच अभ्यास करताना मुलांचे लक्ष विचलीत होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. यासाठी टीव्ही, मोबाइल बंद ठेवणे, कमीत कमी आवाजात बोलणे या गोष्टी करायला हव्यात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.