डॉक्टर आणि तज्ज्ञ हे सर्व असे मानतात की, चिंता ही अनेक आजारांचे कारण ठरू शकते. सामान्यत: चिंता किंवा एंग्जायटी (Anxiety) झाल्यास देण्यात येणाऱ्या औषधांचे काही पार्श्वप्रभाव होऊ शकतात. याबाबत लोकांच्या मनात भीती आणि संभ्रमही असतात. त्यामुळे, सामान्यत: लोक चिंता किवा मानसिक विकारांच्या स्थितीत आयुर्वेदिक, हर्बल आणि अन्य प्राकृतिक उपचार किंवा औषधीच्या सेवनाला प्राथमिकता देतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही हर्बल औषधी आणि आयुर्वेदिक वनस्पतींबाबत माहिती देत आहोत ज्यांच्याविषयी करण्यात आलेले विविध संशोधन आणि आभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, ते चिंता कमी करण्यास सक्षम असू शकतात. आयुर्वेदिक विशेषज्ञ डॉ.पी.वी रंगनायकुलू सांगतात की, आयुर्वेदमध्ये अश्वगंधा आणि वेलेरियन हर्ब चिंता निवारणासाठी उपयोगात आणली जाते.
अश्वगंधा
अश्वगंधा ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे, जिला इंग्रजीमध्ये 'अडाप्टोजेन' असे म्हणतात. ती शरीरातील विविध तंत्रे आणि अशा हार्मोन्सला प्रभावित करते जिला ताण निर्माण करण्यासाठी जबाबदार मानले जाते. चिंता आणि नैराश्यामध्ये अश्वगंधाच्या उपयोगाबाबत वर्ष 2019 मध्ये एक छोटी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. 8 आठवड्यांच्या कालावधीच्या या अभ्यासात तणावात किंवा चिंताग्रस्त असलेल्या 58 व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान वेगवेगळ्या गटातील सहभागींना तीन प्रकारचे उपचार देण्यात आले होते.
एका गटाला दररोज 250 मिलीग्राम (mg) तर, दुसऱ्या गटाला दररोज 600 मिलीग्राम अश्वगंधाचे अर्क देण्यात आले, तेच एका गटाला प्लेसिबोचा (मानसिक समस्येत देण्यात येणारी औषधी) डोस देण्यात आला. यात अश्वगंधा घेणाऱ्या सहभागींमध्ये प्लेसिबो देण्यात आलेल्या गटाच्या तुलनेत तणावासाठी जबाबदार असलेले हार्मोन 'कोर्टिसोल' कमी आढळले, त्याचबोरबर या सहभागी व्यक्तींच्या झोपेच्या गुणवत्तेत देखील सुधार दिसून आला. त्याचवेळी, 600 मिलीग्राम अश्वगंधा घेतलेल्या सहभागींमध्ये तणावाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली.
कॅमोमाइल
कॅमोमाइल ही एका फुलापासून निर्माण होणारी औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा चहा आजकाल देशात आणि परदेशात खूप लोकप्रिय आहे. कॅमोमाइल दोन प्रकारची असते - रोमन कॅमोमाइल आणि जर्मन कॅमोमाइल. या दोघांचाही लोक औषधीरुपात उपयोग करू शकतात. 2016 च्या वैद्यकीय चाचणीत सामान्यीकृत चिंता विकारासाठी (GAD) दीर्घकाळ उपचार म्हणून कॅमोमाइलची गुणकारिता आणि सुरक्षितता तपासण्यात आली होती.
या चाचणीत सर्व 93 सहभागी व्यक्तींना 12 आठवड्यांपर्यंत दररोज 1 हजार 500 मिलीग्राम कॅमोमाइल घेतली. 26 आठवड्यांनंतर अर्ध्या सहभागींनी कॅमोमाइलऐवजी प्लेसिबो घेण्यास सुरुवात केली, तसेच अर्ध्या सहभागींनी कॅमोमाइल घेणे सुरूच ठेवले. चाचणीनंतर संशोधकांना असे आढळून आले की, ज्या सहभागींनी कॅमोमाइल घेणे सुरू ठेवले त्यांच्यात प्लेसिबो घेतलेल्या सहभागींच्या तुलनेत सुरुवातीला फारसा फरक दिसला नाही. परंतु, जेव्हा त्यांची समस्या रिलॅप्स्ड झाली तेव्हा त्यांच्यात आधीच्या तुलनेत आणि सामान्य अवस्थेच्या तुलनेत कमी गंभीर लक्षण दिसून आलेत. येथे हे माहिती असणे देखील आवश्यक आहे की, काही लोकांना कॅमोमाइलची अॅलर्जी देखील होऊ शकते. तुम्हाला रॅगवीड (Ragweed), क्रिसॅन्थेमम (Chrysanthemum), झेंडू (Marigold), रोझमेरीची अॅलर्जी असेल तर तुम्हाला कॅमोमाइलची अॅलर्जी असू शकते.
याशिवाय कॅमोमाइल चहा किंवा सप्लिमेंटचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानंतरच करावे, कारण कॅमोमाइल काही औषधींबरोबर परस्पर क्रिया करू शकते, जसे रक्त पातळ करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधी वॉर्फेरिन आणि अँटिरिजेक्शन ड्रग सायक्लोस्पोरिन.
व्हलेरियन
व्हलेरियन ही औषधी वनस्पती आहे जी युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये उगवली जाते. या वनस्पतीचे बोटॅनिकल नाव व्हलेरियन ऑफिशिनॅलिस असे आहे. त्याचा वापर अन्न आणि पेय पदार्थांमध्ये फ्लेवरसाठी होतो. परंतु, झोपेसंबंधी विकार विशेषत: झोपण्यास असमर्थता (insomnia) चिंता आणि ताण, नर्वस अस्थमा, उत्तेजना, हाइपोकॉन्ड्रिया, डोकेदुखी किंवा माइग्रेन, डिप्रेशन आणि लक्ष केंद्रित करण्यात समस्या झाल्यास याचा वापर खूफ फायदा पोहोचवतो. तसे या संदर्भात करण्यात आलेल्या संशोधनांच्या परिणामांमध्ये हे फायदे दिसून आले आहेत, परंतु पूरक आणि एकत्रित आरोग्यासाठी राष्ट्रीय केंद्र (एनसीसीआईएच/NCCIH) या परिणामांना पूर्ण समर्थन देत नाही, त्यामुळे व्हलेरीयन हे चिंता किंवा नैराश्येला कमी करू शकते का? याचे उत्तर शोधण्यासाठी तज्ज्ञ अधिक संशोधन करण्याच्या आवश्यक्तेवर भर देतात.
एनसीसीआईएचनुसार, काही विशिष्ठ परिस्थितींमध्ये लोकांनी व्हलेरियन टाळायला हवे. जसे गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या माता आणि 3 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले. या बारोबरच, दारूबरोबर या वनस्पतीचे सेवन धोकादायक प्रभाव दाखवू शकते, हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे.
गॅल्फिमिया ग्लौका
गॅल्फिमिया ग्लौका ही मॅक्सिकन मूळच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे, ज्याचा उपयोग लोक परंपरेने चिंता कमी करण्यासाठी ट्रँक्विलायझर म्हणून करतात. वर्ष 2012 च्या वैद्यकीय चाचणीमध्ये जीएडीसाठी उपचार म्हणून जी ग्लौकाच्या परिणामकारकतेची तपासणी करण्यात आली होती. या संशोधनात काही सहभागींना 12 आठवड्यांसाठी जी ग्लौका आणि काही सहभागींना वैद्यकीय सल्ल्यावर अँटी - एंग्जायटी औषध लोराजेपम डी देण्यात आली होती. या संशोधनात चाचणीसाठी संशोधकांनी पुढील 3 आठवडे सहभागींचे निरीक्षण करणे सुरू ठेवले. ज्या नंतर परिणामांवरून असे लक्षात आले की, ज्या सहभागींनी 0.175 मिलीग्राम जी ग्लौकाचा दैनिक डोस मिळवला त्यांच्यात लोराजेपम घेणाऱ्यांच्या तुलनेत जीएडीच्या लक्षणांमध्ये अधिक कमतरता दिसून आली. त्याचवेळी 2018 मध्ये झालेल्या एका पुनरावलोकनामध्ये देखील चिंतेवर उपचार म्हणून जी ग्लौकाचे पुरावे आश्वासक मानले गेले.
कावा - कावा
कावा - कावाचे वैज्ञानिक नाव पाईपर मेथिस्टिकम आहे. प्रशांत बेट समुहामध्ये लोक तणावाला दूर करणे आणि मनोदशा बदलण्याच्या उद्देश्याने कावाने बनवलेल्या पेय पदार्थांचा सेवन करतात. 2013 च्या एक प्लेसबो - नियंत्रित चाचणीत जीएडीसाठी उपचार म्हणून कावाच्या परिणामकारकतेचा तपास करण्यात आला होता. 6 आठवड्यांच्या आभ्यासात 75 सहभागींना समाविष्ट करण्यात आले होते, ज्यांना वेगवेगळे तीन प्रकारचे उपचार देण्यात आले होते. यांतून काहींना 120 मिलीग्राम आणि काहींना प्लेसिबोचा डोस देण्यात आला होता. कावा घेतलेल्या सहभागींनी प्लेसबो घेतलेल्या लोकांच्या तुलनेत चिंतेमध्ये लक्षणीय घट दर्शविली होती.
सुरक्षा मानके
डॉ.पी.व्ही रंगनायकुलू स्पष्ट करतात की, आयुर्वेदमध्ये चिंता किंवा इतर मानसिक विकारांच्या उपचारावर केवळ अश्वगंधा किंवा व्हलेरियनचा उल्लेख मिळतो. परंतु, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विभिन्न प्रकारच्या हर्ब्सचा वापर चिंतेत कमतरता किंवा मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो. मात्र, कोणत्याही प्रकारचे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.
हेही वाचा - ऑलिव्ह ऑईलचा उपयोग आरोग्यासाठी चांगला की हानिकारक? पोषण तज्ज्ञ सांगतात..