केस गळणे हे महिला आणि पुरुषांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. सामान्यत: ताण, प्रदूषण, अस्वस्थ जीवनशैली, खराब आरोग्य, अयोग्य आहार यांना केश गळतीचे कारण मानले जाते. मात्र, वर्तमान काळात कोरोना नंतर केस गळतीचाही प्रकार पुढे येत आहे. तज्ज्ञ सांगतात की, काही योग आभ्यासाने केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकते.
कोविड 19 चा विषाणू आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर आक्रमण करून त्यास अधिक कमजोर बनवतो, त्यामुळे संसर्गा नंतरचे परिणाम शरीरावर अधिक काळापर्यंत दिसून येतात. कोविड नंतर केस गळतीची समस्या ही चिंताजनक आहे. मात्र, तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक मानतात की, चांगले आहार आणि अनुशासित जीवन शैलीसोबत जर नियमित योग केले तर, केसांचे तुटने आणि गळतीच्या समस्येला बऱ्याच प्रमाणात कमी केले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत सुखीभव' आपल्या वाचकांना 6 योग आसनांची माहिती देत आहे. ही योगासने केसांना मजबूत आणि त्यांची चमक परत मिळवण्यास मदत करू शकतात.
योग आसनांचा लाभ
काही योग आसनांनी डोके आणि कवटीमध्ये रक्तसंचार वाढवले जाऊ शकते. हे आसन डोक्यातील रक्ताभिसरण वाढते, ज्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण चांगल्यारितीने पोहोचते. परिणामी केसांचे आरेग्य चांगले होऊ लागते. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी पुढील आसनांचा आभ्यास केला जाऊ शकतो.
1) कपालभाती प्राणायम किंवा अग्नि श्वास
- पाठीच्या कण्याला सरळ ठेवून आरामात बसा. हातांना गुडघ्यांवर ठेवा. हातांच्या तळव्यांची दिशा आकाशाकडे असावी. एक दीर्घ श्वास घ्या.
- श्वास सोडताना आपल्या पोटाला अशा प्रकारे अंदर घ्या की, ते पाठीच्या कण्याला स्पर्श करेल. मात्र, जितके शक्य आहे तितकेच.
- आता पोटांच्या स्नायूंना ढिले सोडा आणि आपल्या नाभी आणि पोटाला आराम द्या, असे करताना श्वास आपोआप आपल्या शरीरात जाते.
- सुरुवातील या प्रक्रियेला 10 वेळा करा.
2) नाडी शोधन किंवा वैकल्पिक नाकपुडी श्वास
- आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवून जमिनीवर आरामात बसा.
- या स्थितीत श्वास घेण्याची लय सामान्य करण्यासाठी सामान्य पद्धतीने श्वास घ्या.
- आता आपल्या डाव्या हाताला डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या हाथाला नाका जवळ न्या आणि अंगठ्याने उजव्या नाकपुडीला बंद करा आणि आपल्या डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या.
- आता डाव्या नाकपुडीला आपल्या रिंग बोट (ring finger) आणि करंगळीने बंद करा आणि आपल्या उजव्या नाकपुडीला उघडून श्वास सोडा.
- आता डाव्या नाकपुडीला बंद ठेवत उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या, त्यानंतर उजवी नाकपुडी बंद ठेवून डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा.
- ही प्रक्रिया 10 वेळा करा.
3) अधो मुख स्वनासन
- आपल्या हाथ आणि पायांवर बसून शरीराला एका टेबलसारख्या स्थितीत आणा.
- आता श्वास सोडत आणि आपल्या गुडघ्यांना आणि कोपरांना सरळ करत कमरेला वर उचला आणि आपल्या शरीराला उलट्या 'व्ही' (इंग्रजी अक्षर) सारखा आकार द्या.
- लक्षात ठेवा, हाथ आणि खांद्यांच्या मधात जेवढे अंतर राहील, तेवढेच अंतर पाय आणि कमरीच्या मधात असावे.
- आपल्या हाथाला जमिनीवर दाबा आणि आपली मान सरळ करा. तुमच्या कानाचा स्पर्श तुमच्या हाताला झाला पाहिजे. तुमची नजर तुमच्या नाभीवर ठेवा आणि श्वास घ्या.
- आता श्वास सोडत गुडघे वाकवा आणि पूर्वीच्या टेबलसारख्या स्थितीत या.
4) उत्तानास किंवा स्टँडिंग फॉरवर्ड पोज
- आपल्या दोन्ही पायांमध्ये कंबरे एवढे अंतर ठेवून उभे राहा.
- आता श्वास घ्या आणि दोन्ही हातांना वरच्या दिशेने छतकडे उभे करा.
- श्वास सोडा आणि पुढे झुकत हातांच्या तळव्यांना आपल्या पायाजवळ जमिनीवर ठेवा.
- गुडघ्यांना वाकू देऊ नका, अंतिम स्थितीत डोके गुडघ्यांना स्पर्श न होऊ देता वरच्या दिशेने न्या.
- या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या.
- आता पुन्हा श्वास सोडा आणि डोके गुडघ्याजवळ ठेवा.
- नैसर्गिकरित्या श्वास घेत सुमारे एक मिनीट किंवा शक्य तितके थांबा.
- आता आधी डोके वर उचला, श्वास घ्या, मग हात उचलत मूळ अवस्थेत परत या.
5) सर्वांगासन किंवा शोल्डर स्टँड
- आपल्या पाठीवर झोपा. आता हळू हळू आधी आपले पाय, मग नितंब आणि नंतर कंबर वरच्या दिशेने उचला. असे केल्याने सर्व भार तुमच्या खांद्यांवर येईल. आता तुमच्या पाठीला तुमच्या हातांचा आधार द्या.
- लक्षात ठेवा, कंबर आणि पाय सरळ असावे आणि शरीराचा पूर्ण भार तुमचे खांदे आणि हातांच्या वरील भागावर असावे, तुमच्या डोक्यावर आणि मानेवर नव्हे.
- तुमच्या शरीराचे पूर्ण वजन खांदे आणि वरच्या हातांवर ठेवूण आपल्या पाठीच्या कण्याला आणि पायांना सरळ करण्याचा प्रयत्न करा.
- श्वास सोडा आणि याच स्थितीत 15 ते 30 सेकेंद श्वास घ्या आणि नंतर हळू हळू हातांनी कंबरेला आधार देत मूळ अवस्थेत परत या.
6) वज्रासन किंवा डायमंड पोज
- या आसनाला करण्यासाठी गुडघ्यांना वाकवून पंजांवर सरळ बसा.
- दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना भेटली पाहिजे आणि पायांच्या घोट्यामध्ये अंतर असावे.
- शरीराचा सर्व भार पायांवर ठेवा आणि दोन्ही हात मांड्यांवर ठेवा.
- लक्षात ठेवा कंबरेचा वरील भाग पूर्णपणे सरळ असावा. थोडा वेळ या स्थितीत बसून दीर्घ श्वास घ्या.
- या स्थितीत 2 मिनिटे बसा आणि हळू हळू वेळ वाढवत जा.
हेही वाचा - चांगल्या पॅरेंटिंगसाठी 'या' टिप्स ठरू शकतात फायदेशीर