ETV Bharat / sukhibhava

Peptides In Your Skincare : स्किन केअरमध्ये पेप्टाइड्स का करावे समाविष्ट ; जाणून घ्या 5 कारणे

खाण्यात रसायनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे त्याचा आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्यासह प्रदूषणामुळेही त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यासाठी पेप्टाइड्स उपयोगी असल्याचा दावा तज्ञ करतात.

Peptides In Your Skincare
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 5, 2023, 4:02 PM IST

नवी दिल्ली : सध्या अवेळी खाणे आणि रसायनांच्या अतिवापरामुळे त्वचेवर लवकर वाईट परिणाम होतात. त्यामुळे त्वचेची काळजी योग्य पद्धतीने घेण्याची गरज असते. गेल्या काही वर्षात स्किन केअर आणि त्याच्याशी संबंधित पद्धतींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. दर दोन महिन्यांनी उत्‍पादन बाजारात आल्याचे लक्षात येते. परंतु तुमच्‍या रंगासाठी कोणते सर्वोत्तम असेल हे जाणून घेण्‍यासाठी ट्रेंड टाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या लोकप्रिय घटकांपैकी पेप्टाइड्स आहे.

काय आहे पेप्टाइड्स : पेप्टाइड्स हे अमीनो अ‍ॅसिड असतात, ते त्वचेच्या संरक्षणात्मक थरातून जाऊ शकतात. आपल्या शरीराला स्वतःच आंतरिकरित्या कोलेजन तयार करण्यास मदत करतात. घेण्यासाठी पेप्टाइड्स तुमचा रंग सुधारण्यास मदत करणाऱ्या घटकांची यादी त्वचारोग तज्ज्ञ मालिनी अदापुरेड्डी या करतात. त्यामुळे पेप्टाइड्स हे त्वचा उजळ करण्यास मदत करत असल्याचा दावा करण्यात येतो.

वृद्धत्वविरोधी गुणधर्म : पेप्टाइड्स थेट त्वचेवर लावल्यामुळे ते बाहेरील थरातून खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे पेप्टाइड्स लावल्यानंतर कोलेजन तयार होते, त्यासह कोलेजनच्या निर्मितीला चालनाही देते. त्वचेच्या उत्पादनांमध्ये कोलेजन उत्पादनास उत्तेजन देण्याच्या क्षमतेसाठी, त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी पेप्टाइड्स खूप उपयोगी असल्यााच दावा तज्ञांकडून करण्यात येतो.

त्वचा उजळण्यास मदत : जीवाणू, अतिनील किरण, प्रदूषण आणि इतर कणांपासून शरीराच्या संरक्षणासाठी त्वचा उपयोगी आहे. त्यामुळे या सगळ्यांचा हल्ला आपल्या त्वचेवर होते. सिगारेटचा धूर, इतर प्रदूषणांच्या संपर्कात येणे, अगदी कमी झोप यामुळे त्वचेला हानी पोहोचते. पेप्टाइड्स त्वचेच्या नवीन पेशींचे उत्पादन करून कोलेजन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास प्रोत्साहन देतात.

जळजळ कमी होणे : दुखापत किंवा संसर्ग झाल्यास जळजळ होणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. परंतु दीर्घकाळ जळजळ झाल्यामुळे ऊतींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होऊ शकते. पेप्टाइड्स विशिष्ट रेणूंना सुधारित करून त्वचेतील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे एक निरोगी आणि अधिक तरूण असलेली त्वचा दिसून येते.

त्वचेचा टोन सुधारण्यास करते मदत : असमान त्वचेचा टोन असल्यास अर्थात हायपरपिग्मेंटेशन असल्यास त्याला पेप्टाइड्स उपयोगी ठरतात. सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल आणि वृद्धत्व यासारख्या विविध कारणांमुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते. पेप्टाइड्स मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करून त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करू शकतात. त्वचेला विविध हानीकारक बाह्य घटकांपासून रोखून, पेप्टाइड्समुळे काळे डाग आणि त्वचेच्या नुकसानाची इतर चिन्हे देखील कमी होऊ शकतात.

त्वचेचे सुधारते हायड्रेशन : पेप्टाइड्स त्वचेच्या आर्द्रतेची पातळी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नैसर्गिक पदार्थ हायलुरोनिक अ‍ॅसिडच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात. त्यामुळे त्वचेच्या हायड्रेशनमध्ये मदत होऊ शकते. पेप्टाइड्समध्ये एन्झाईम्स असल्याने ते त्वचेतील हायलूरोनिक अ‍ॅसिडची पातळी राखण्यास मदत करतात. त्यामुळे हायड्रेशन वाढून त्वचेचा पोत सुधारतो. त्यासह त्वचा हायड्रेटेड आणि स्मूथ राहते.

हेही वाचा - Healthy And Easy Tea Recipes : चहामुळे दिवसाची सुरुवात होते ताजीतवानी; असा करा तुमचा आवडता चहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.