ETV Bharat / sukhibhava

कोविड-१९ची 2020 डायरी : मानवी शरीरावर परिणाम - मानवी शरीर कोविड परिणाम

कोविड १९ चा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर झालेला दिसला. मग ती श्वसन यंत्रणा असो, पचनसंस्था असो किंवा मज्जासंस्था, या विषाणूमुळे सगळ्याच प्रणालींवर परिणाम झाला. अर्थात, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळली. म्हणूनच कोविड १९च्या २०२० डायरीतून ईटीव्ही भारत सुखीभवची टीम तुम्हाला या जीवघेण्या आजारासंबंधित माहिती आणि त्याचे दुष्परिणाम पुन्हा सांगत आहे.

covid-19
कोविड-१९
author img

By

Published : Dec 26, 2020, 6:36 AM IST

हैदराबाद - भारतात कोविड १९ चा पहिला रुग्ण सापडून जवळजवळ १ वर्ष झाले. पण तरीही या विषाणूबद्दलची लोकांच्या मनातली भीती तशीच आहे. सुरुवातीला या विषाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या चिंताजनक होती. आता मात्र डॉक्टरांना या रोगाला कसे हाताळायचे हे कळायला लागले आहे. पण तरीही कोरोना विषाणूच्या नंतरच्या परिणामांची काळजी डॉक्टर्स आणि संशोधकांना वाटत आहे. जरी बाजारात लवकरच कोविड १९ वरची लस उपलब्ध होईल, अशी घोषणा केली गेली आहे, तरीही या विषाणूमध्ये होणारा बदल, त्याच्या लक्षणांमध्ये होणारे बदल आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम यामुळे लोकांना ही लस किती परिणामकारक असेल याबद्दल शंका येत आहे.

कोविड १९ – साथीचा रोग

कोविड १९ चा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात सापडला होता. तिथूनच हा रोग सगळ्या देशांमध्ये पसरायला सुरुवात झाली. लोक इतर देशांत प्रवास करत होते, त्यामुळे अगदी महिन्याभरात या साथीच्या रोगाने जगभर हाहाकार माजवला. सुरुवातीला या रोगाला 'SARS-CoV-2' हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर कोविड १९ (Covid-12480019) किंवा कोविड विषाणू आजार २०१९ असे नाव दिले गेले. या आजारात प्रथम सर्दी, खोकला आणि तीव्र ताप असायचा. ही लक्षणे दिसली की कोरोना झाला असे लक्षात यायचे. पण जसा हा आजार आणखी प्रगत झाला, तशी लक्षणे बदलत गेली. श्वास घ्यायला त्रास, वास आणि चव न कळणे ही लक्षणेही दिसू लागली. त्यानंतर जुलाब, डोकेदुखी आणि शरीरात वेदना, कमालीचा अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणेही समोर आली. या वर्षी कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा बळी गेला आणि हा आजपर्यंतचा सर्वात गंभीर साथीचा रोग मानला जात आहे. या आजाराने जगण्याची शैली पूर्णपणे बदलली. मानसिकही किंवा शारीरिकही. विषाणूचा परिणाम जगभरातील प्रत्येकावरच मोठ्या प्रमाणावर झाला. शारीरिक अंतर कायम ठेवण्याबरोबरच, मास्क घालणे आणि हात आणि वस्तूंची सतत स्वच्छता करणे हे प्रत्येकासाठी महत्वाचे बनले.

अनेक आजार असलेल्या व्यक्तींवर कोविड १९ चा परिणाम

ज्या व्यक्तींना हृदय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग इत्यादी आजार आहेत, त्यांच्या आरोग्यावर कोविड १९ चा परिणाम सर्वात जास्त झाला. अशा प्रकारचे आजार असणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती तशीही कमी असते आणि सर्वात वाईट म्हणजे कोरोना विषाणू रोगप्रतिकारक यंत्रणेवर थेट हल्ला करतो. या लोकांना कोविड रोगाचा धोका जास्त असतो. आता हृदयरोग असणाऱ्यांचेच पाहू. मिळालेल्या माहितीनुसार २०२० मध्ये हृदयरोगाचे रुग्ण आधीपेक्षा जास्त वाढले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेल्या माहितीनुसार, या वर्षी जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने झालेले मृत्यू हे गेल्या २० वर्षांतल्या मृत्यूपेक्षा सर्वाधिक आहेत. आकडेवारीनुसार हृदयविकारामुळे मृत्यूची संख्या १६ % आहे.

फुफ्फुसे आणि श्वसन प्रणालीवर परिणाम

सुरुवातीपासूनच कोरोना हा श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसांशी संबंधित एक रोग मानला जात आहे. कारण त्याची लक्षणे फ्लू आणि न्यूमोनियासारखीच होती. एखाद्या व्यक्तीला हा आजार झाल्यास त्याच्या फुफ्फुसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अनेक लोकांनी श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे सांगितले आणि कोरोना रुग्णांमध्ये फुफ्फुसाचे गंभीर आजार झाल्याचीही नोंद आहे. रुग्णांची फफ्फुसे कार्य करेनाशी झाली. व्हेंटिलेशन आणि गॅस एक्सचेंज यावर परिणाम झाला. रुग्णाला जास्त ऑक्सिजन पुरवला गेला. एवढेच नाही तर कोरोनातून बरे झाल्यानंतरही लोकांच्या श्वसन प्रणालीवर दीर्घकाळापर्यंत गंभीर दुष्परिणाम होत आहेत, हे चिंतेचे कारण आहे.

पचनसंस्था आणि स्वादुपिंडावर परिणाम

कोविड १९ मुळे केवळ फुफ्फुसच नाही तर बर्‍याच रूग्णांमध्ये भुकेवरही परिणाम झाला. प्रतिकारशक्ती कमी होण्याबरोबर, पचनसंस्था, आतडे आणि यकृत देखील कमकुवत झाले. परिणामी, लोकांना पोटात दुखणे, अतिसार, जिभेची चव जाणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागला. डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना आधीच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट आणि पचनाचा त्रास होता, या विषाणूमुळे त्यांचा हा त्रास आणखी वाढला. यामुळे अनेक रुग्णांच्या भुकेवर परिणाम झाला आणि अशक्तपणा वाढला.

मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम

कोविड १९ चे मुख्य लक्षण म्हणजे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यावे चव आणि गंध न कळणे. याबरोबर नसांना सूज येणे, वेदना होणे, रक्ताची गुठळी होणे, सतत आणि तीव्र डोकेदुखी इत्यादी त्रासही झाले. लोकांनी मायग्रेनचीही तक्रार केली. या व्यतिरिक्त, डॉक्टरांनी मोठ्या संख्येने कोविड १९ तून बऱ्या झाल्ल्या रूग्णांचीही नोंद केली. ज्यात त्यांना चव आणि गंध घेण्याच्या क्षमतेवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतल्या भागाचे कायमचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

मूत्रपिंडाच्या आजारात वाढ

कोविड १९ आजार झालेल्या रुग्णांच्या किडनीवर परिणाम झाला. तो इतका झाला की त्यांना डायलेसिसची गरज लागू लागली. डॉक्टरांच्या मते, जेव्हा जेव्हा कोणत्याही संसर्गामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो किंवा डायलेसिस आवश्यक असते, तेव्हा ३ दिवस ते ३ आठवड्यांत रुग्ण बरे होण्याची शक्यता असते. परंतु कोविड १९ च्या संसर्गामुळे मूत्रपिंडाचे जे गंभीर नुकसान होते, ते लवकर बरे होत नाहीत. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे इथे एक चिंताजनक समस्या अशी आहे की कोविड १९ च्या दुष्परिणामांमुळे रुग्णांना दीर्घकालीन क्रॉनिक डायलेसिसची आवश्यकता भासू शकते आणि भविष्यात त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरजही लागू शकते.

वर्षभर उद्भवणाऱ्या मानसिक समस्या

कोरोना विषाणूने सुरुवातीपासूनच लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण केली. कोरोनाचा आजार, आर्थिक अस्थिरता, बेरोजगारी, भविष्य, शिक्षण किंवा मृत्यू, यामुळे जगभरातील बहुतेक लोकांना वर्षभर तणाव, नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. सेलिब्रिटी असो वा सामान्य जनता, यावर्षी मोठ्या संख्येने लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मुले, प्रौढ, वृद्ध, प्रत्येक वर्गातल्या स्त्री – पुरुषांचा समावेश होता. ही संख्या इतकी वाढली की काळजीचे कारण बनली. अनेक सरकारी आणि अशासकीय संस्थांनी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने लोकांना ऑनलाइन मदत देण्यास सुरवात केली. ऑनलाइन सेशन्स अनेक तज्ज्ञांनी घेतली. या २०२० वर्षात मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणाऱ्यांची संख्या चौपटीने वाढली.

म्हणूनच हे वर्ष खूप कठीण होते आणि प्रत्येकासाठीच या वर्षाने अनेक आव्हाने समोर आणली. अनेक जणांची जवळची माणसे कोविडने हिरावून घेतली. अनेकांच्या नोकऱ्या, घरे गेली. आपण आशा करू की २०२१ हे वर्ष एकदम आनंददायी असेल. तरीही, लस येईपर्यंत प्रत्येकाने सावध असायलाच हवे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.