यवतमाळ - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र, या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शहरातील एक अवलिया पिण्याचे पाणी वाटपाचे काम करत आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शहरातील नागरिक एकसाथ पुढे सरसावले आहेत. आपली जबाबदारी ओळखून नागरिक जनता कर्फ्युला प्रतिसाद देत आहे. या परिस्थिीत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. तर तेच दुसरीकडे या अत्यावश्यक सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंकुश माकोडे या तरुणाने आज (सोमवारी) कार्यालयात जाऊन पाणी वाटप केले. अधिकाऱ्यांना पाणी वाटप करणाऱ्या तरुणाचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - COVID-19 : 'आपली एक चूक खूप मोठा धोका निर्माण करू शकते'
कर्फ्युमुळे ही बाजारपेठ पूर्ण बंद आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनानुसार रविवारी सकाळपासून कर्फ्युला जनतेने प्रतिसाद दिला. सोमवारी सकाळी 5 वाजता पासून कलम 144 लागू करण्यात आल्याने संचारबंदी लावण्यात आली. अशा वेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी अंकुश मकोडे यांनी निस्वार्थी पणे पाणी वाटप केले.