यवतमाळ - वणी तालुक्यातील परासोडा कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना योगाचे धडे देण्यात आले. प्रशिक्षक संजय आसकर यांना बोलावण्यात आले होते. त्यांनी योगा आणि हास्यातून आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याबाबत सांगितले. शिवाय यावेळी त्यांनी हास्यातून रुग्णांचे मनोबलही वाढविले. कोरोनामुळे रुग्णाची मानसिकता बिघडते. त्यामुळे योगा करुन आरोग्य चांगले आणि सुदृढ करता येते, अशी भावनाही यावेळी आसकर यांनी बोलून दाखविली.
कोरोनाबाधित रुग्ण हा आजाराने आधीच भयभीत असतो. अशात त्यांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असते. यासाठी औषधी आणि आहारासोबत मानसिक संतुलन ठेवण्यासाठी योगा हा महत्त्वाचा असल्याने सेंटरमधील बाधित रुग्णांना रोज सकाळी योगा व हास्याचे धडे देण्यात आले. शिवाय यावेळी कोविड केंद्रातील रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा -कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन