ETV Bharat / state

यवतमाळ : जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात - यवतमाळ जिल्हा लेटेस्ट न्यूज

महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे, या लसीकरणासाठी जिल्ह्यात साडेसात हजार लसींचे डोस प्राप्त झाले असून, जिल्ह्यात पाच केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. यात यवतमाळ शहरातील लोहारा व पाटीपुरा केंद्र तर पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

author img

By

Published : May 3, 2021, 6:04 PM IST

यवतमाळ - महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे, या लसीकरणासाठी जिल्ह्यात साडेसात हजार लसींचे डोस प्राप्त झाले असून, जिल्ह्यात पाच केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. यात यवतमाळ शहरातील लोहारा व पाटीपुरा केंद्र तर पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण‍ पांचाळ यांनी लोहारा येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन, लसीकरणाचा आढावा घेतला. त्यांच्या उपस्थितीत नोंदणी केलेल्या सिध्दे‍श दिवाकर पांडे ( 33) या लाभार्थ्याला प्रथम लस देण्यात आली. तसेच जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार यांनी लोहारा लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीसुध्दा दारव्हा येथील लसीकरण केंद्राला भेट देत लसीकरणाचा आढावा घेतला.

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक

45 वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी उपलब्ध लसीनुसार नियमित मोहीम विविध केंद्रांवर सुरू राहणार आहे. 18 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाकरता 'कोव्हीन ॲपवर' ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना लस मिळणार नाही. नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तिने कोणत्या केंद्रावर किती वाजता जावे, याबाबत संदेश प्राप्त होईल. दिलेल्या ठराविक वेळेत केंद्रावर जावून लाभार्थ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून लसीकरणासाठी एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन कण्याचे आवाहन

लस घेतल्यावरसुध्दा दैनंदिन मास्कचा वापर, गर्दी टाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, विनाकारण बाहेर न फिरणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांनी केले आहे.

हेही वाचा - अविवाहित प्रियकराने केले लग्न, विवाहित प्रेयसीने पती आणि दिराच्या मदतीने काढला काटा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.