यवतमाळ - भाजप कार्यकर्त्यांना आता काही काम उरलं नाही. त्यांनी तक्रारी केल्या तर आम्ही त्यांना भीक घालत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलले ते खरंच बोलले आहेत. तर गेल्या दोन वर्षांत भाजपचा भ्रमनिरास झाल्याने तक्रारीची भाषा करत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा - भाजपा हा महान पक्ष आहे, ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात - संजय राऊत
भाजप कार्यकर्त्यांना काही काम उरलं नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रारी देऊन शिवसेनेला घेरण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल योग्यच बोलले. त्यात काही चुकीचे नाही. भाजपच्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. शिवसेना अशा तक्रारींची पर्वा करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी भाजपकडून पोलीस ठाण्यात दिल्या जाणार आहेत.
हेही वाचा - डिसेंबरपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण दिले नाही तर मंत्र्यांना गावबंदी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा