ETV Bharat / state

Yavatmal Cholera explosion : यवतमाळ जिल्ह्यात डायरिया कॉलराचा उद्रेक, 20 रुग्ण आढळले, 1 महिलेचा मृत्यू - Health Department

Yavatmal Cholera explosion : सध्या स्थिती गावामध्ये रोज डायरियाचे रुग्ण पुढे येत आहेत. यामध्ये 19 जुलैला रोजी 14 रुग्ण, तर 20 जुलै रोजी 9 रुग्णांना डायरियाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी करून सर्वांवर औषध उपचार केले जात आहे.

Yavatmal Cholera explosion
Yavatmal Cholera explosion
author img

By

Published : Jul 23, 2022, 12:25 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे ( Rain ) जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. यातच नेर तालुक्यातील वाई पारस येथे एकाच दिवशी 20 जणांना डायरियाची लागण झाल्यानंतर इतर तालुक्यातही डायरीयाचे रुग्ण वाढत आहे. ( Yavatmal Cholera explosion ) विशेष म्हणजे वाई पारस येथील दोघांचा कॉलरा अहवाल पॉझिटिव्ह ( Positive ) आल्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग ( Health Department ) सतर्क झाले आहे.

Yavatmal Cholera explosion

काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या डोंगरी भागामध्ये दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे एकाचवेळी अनेक गावकऱ्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान आरोग्य विभागाने गावकऱ्यांची तपासणी केली. त्यामध्ये सर्वांनाच डायरीयाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर उपचार सुरू असतानाच 4 गावकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. असाच काहीसा प्रकार सध्या नेर तालुक्यातील वाई पारस येथे उघडकीस आला आहे. येथे एकाच वेळेस अनेक गावकऱ्यांना उलटी, संडासचा त्रास सुरू झाला. एकाच दिवशी 20 गावकऱ्यांच्या प्रकृतीत बिघडली आहे. गावकऱ्यांना डायरीयाची लागण झाली. जिल्हा आरोग्य विभागाने ही बाब लक्षात घेत ग्रामीण रुग्णालयाला सतर्क केले आहे. संपूर्ण गावात गावकऱ्यांच्या आरोग्य तपासणीचे निर्देश देत गावात आरोग्य शिबिर सुरू केले आहेत.

सध्या स्थिती गावामध्ये दररोज डायरियाचे रुग्ण पुढे येत आहेत. यामध्ये 19 जुलैला रोजी 14 रुग्ण, तर 20 जुलै रोजी 9 रुग्णांना डायरियाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी करून सर्वांवर औषध उपचार केले जात आहे. यासोबतच यवतमाळ शासकीय रुग्णालयात 3, क्रिटी केअर येथे 2, नेर खाजगी रुग्णालयात 1, यवतमाळ येथे डॉ. वीरेंद्र राठोड यांच्याकडे 2, डॉ. चव्हाण यांच्याकडे 13 वर्षीय मुलीवर उपचार सुरू आहे. नेर तालुक्यातील वाईपारस सोबतच जिल्ह्यातील घाटंजी, बाभूळगाव, दारव्हा तालुक्यात डायरीचे रुग्ण आढळून येत असल्याने उद्रेक होत आहे.

वाई पारस येथे उद्रेकाचे कारण - वाई पारस येथे डायरीयाचा उद्रेक झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने गावात जलस्त्रोतांची माहिती घेत सर्वेक्षण केले आहे. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नळ योजना बंद होती. गावात 30 ठिकाणी असलेल्या हातपंपद्वारे पिण्याचे पाणी वापरले जात होते. परंतु सर्वच ठिकाणी परिसर अस्वच्छ आणि घाणेरडा असल्यामुळे जलस्त्रोत दूषित झाले. हे दूषित पाणी नागरिकांच्या पिण्यात आल्यामुळे उद्रेक वाढला असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे.

दोघांना कॉलराची लागण - डायरीयाची लागण झाल्यानंतर अनेकांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झाली नाही. अशा रुग्णांसह इतर आजारी रुग्णांची कॉलरा तपासणी केली जात आहे. यापूर्वी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 10 रुग्णांच्या विष्टेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यामध्ये क्रिटी केअर या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचे कॉलरा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्हा आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आलेल्या रुग्णांची सर्व अहवाल नकारात्मक आहे. तर 6 अहवाल प्रलंबित असल्याचे डॉक्टर शेख यांनी सांगितले आहे.

पूरग्रस्त भागात जलजन्य आजाराची भिती - जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गाव शिवारात पाणी शिरल्यामुळे सर्व जलस्त्रोत पाण्याखाली आले आहे. त्यामुळे जलस्त्रोत देखील दूषित झाले आहेत. अशा भागात जलजन्य आजार फोपवण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये दूषित पाण्याचा निचरा होईपर्यंत स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. प्रशासनाचे आरोग्य विभाग देखील अशा पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊन आहे.

पावसाळ्यात जलजन्य आजाराचे प्रमाण वाढते - 5 पेक्षा अधिक रुग्णांना डायरियाची लागण झाल्यास तेथे उद्रेक समजला जातो. वाई पारस येथे उद्रेक घोषित केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, पाण्यामध्ये नियमित जीवन ड्रॉपचा वापर करावा, गावातील जलस्त्रोत परिसर स्वच्छ ठेवावा. शक्यतो दूषित पाणी असल्यास त्या गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. घरात असलेल्या उपलब्ध औषधी व मेडिकल स्टोर मधून विकत घेतलेल्या औषधांचा वापर करू नये, वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावे.

यवतमाळच्या आर्णी पालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे शहरातील पाईप- लाईन फुटल्याने त्यातून दूषित पाणीपुरवठा झाल्याने शहरातील 14 नागरिकांना डायरिया गॅस्ट्रो सारख्या आजाराने ग्रासले आहे. विशेष म्हणजे उपचारादरम्यान एका महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडल्याने पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. सध्या पालिकेवर प्रशासक नेमल्याने मुख्य अधिकारी यांच्यावर शहरातील विविध प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे. मात्र मुख्य अधिकारी रोज वाशिमवरून ये- जा करत असल्याने शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केले जात आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रिया तोडसाम यांनी दिला आहे.

हेही वाचा - Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.