यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कुठे आठवड्यातून एकदा तर काही ठिकाणी महिन्यातून दोनदा नळाला पाणी येत आहे. तालुक्याच्या व शहरी भागात हा पाण्याचा पुरवठा होत असला तरी, ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई असल्याने प्रत्येकाच्या डोईवर पाण्याचा हंडा हीच परिस्थिती जिल्हाभरात पाहावयास मिळतो. जिल्ह्यातील काही भागात तर 'धरण उशाला, आणि कोरड घशाला' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यवतमाळसाठी 5.44 दलघमी पाण्याचा साठा
यवतमाळ शहरात साडेतीन लाखावर जीवन प्रधिकरण ग्राहक असून त्यांना निळोणा या प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत 5.44 दलघमी पाण्याचा साठा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. असे जरी असले तरी यवतमाळ तालुक्यातील काही भागांमध्ये आजही पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येत आहे.
नेल तालुक्यात 2.5 दलघमी पाण्याचा साठा असून पात्र लघु तलाव व तीन विहिरीवरील पंप हाउस या ठिकाणी शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुसद तालुक्याला नदी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून या प्रकल्पात 28.4 दलघमी साठा उपलब्ध आहेत. यातील टंचाईच्या काळात 3. 75 दलघमी साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
घाटंजी तालुक्याला वाघाडी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून सद्यस्थितीत 7.28 दलघमी पाणी साठा असून दर दोन दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
उमरखेड इथे पैनगंगा नदी वैजापूर धरणातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या धरणात 4.0 दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. जून अखेरपर्यंत पाण्याची साठवणूक असल्याने सध्या तरी पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र ग्रामीण भागात पाण्याचे स्त्रोत आटल्याने महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तसेच जिल्ह्यातील वणी, दिग्रस, दारव्हा, पांढरकवडा,आर्णी, महागाव, राळेगाव, कळंब, मारेगाव, झरीजामनी आणि बाबुळगाव या तालुक्यात त्या भागातील धरणातून या प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून जून अखेरपर्यंत पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे
जिल्ह्यातील प्रकल्प -
निळोणा प्रकल्पात 5.44 दलघमी, पुस प्रकल्प 21.94 दलघमी, अरुणावती प्रकल्प 17.80 दलघमी, बेंबळा प्रकल्प 60. 35 दलघमी, अडान प्रकल्प 4.2 दलघमी नवरगाव प्रकल्प 4. 21 दलघमी, गोकी प्रकल्प 9.12 दलघमी, वाघाडी प्रकल्प सात पण 28 दलघमी सायखेडा 8.67 दलघमी, अधार पूस मध्ये 12. 52, बोरगाव 0.74 दलघमी असे एकूण मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा हा 44.36 इतका आहे. तसेच 94 लघु प्रकल्पात 52. 35 दलघमी पाण्याचा साठा आहे.