यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेडमध्ये पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, एक बैल बँडच्या आवाजाने बिथरला आणि पोळ्यात चागलाच थरार पहायला मिळाला.
हेही वाचा - 'माझ्या सर्जा रं...माझ्या राजा रं...' बैलपोळ्यानिमित्त बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिराजवळ पोळा भरला होता. मोठ्या उत्साहात सजूनधजून बैल वाजत गाजत पोळ्यात आले. हा पोळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. बैलजोड्याही मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. आनंदात पोळ्याचा सण पार पडला. पण, एका बैलाने उधळत लोकांना बैलाचा थरार कसा असतो हे दाखवून दिले. एक दोन मिनिटे त्याने चांगलाच प्रसाद लोकांना दिला. यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून दोनजण किरकोळ जखमी आहेत.
हेही वाचा - बैलपोळा दुष्काळात; शेतकऱ्यांच्या 'राजा'ला घागरभर पाण्यातच अंघोळ