ETV Bharat / state

व्हीजेएनटी कल्याण समिती यवतमाळमध्ये धडकली; निकृष्ट दर्जाची कामे, कंत्राटदारावर होणार कारवाई - व्हीजेएनटी कल्याण समिती यवतमाळ पाहणी

विधान मंडळाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती कल्याण समितीने यवतमाळच्या नेर येथे भेट दिली. यात समितीने उत्तरवाढोना, मानिकवाडा, चिकणी डोमगा आणि शहरातील एका आश्रम शाळेची पाहणी केली. यावेळी पाहणीत अनेक वास्तव उघड झाले. निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे समोर दिसले. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई होणार आहे.

VJNT Welfare Committee
VJNT Welfare Committee
author img

By

Published : Sep 24, 2021, 2:01 PM IST

यवतमाळ : विधान मंडळाची भटक्या विमुक्त जाती जमाती कल्याण समिती नेर येथे धडकली. या समितीने नेर तालुक्यातील उत्तरवाढोना, मानिकवाडा, चिकणी डोमगा आणि शहरातील एका आश्रम शाळेची पाहणी केली. यात विधान परिषदेचे आमदार असलेल्या या समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त आहे. यामधे समितीचे प्रमुख आमदार शांताराम मोरे, आमदर संजय दौंड, आमदर राजेश राठोड, आमदर सुरेश भोळे यांचा समावेश होता. या समितीचे अव्वर सचिव सोमनाथ सानप हे देखील उपस्थित होते. तर विधिमंडळ सदस्य समितीच्या दौऱ्यामधे तहसीलदार मगर, गटविकास अधिकारी उज्वला ढोले, यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

व्हीजेएनटी कल्याण समिती यवतमाळमध्ये

पाहणीत अनेक वास्तव उघड

या समितीने तालुक्यातील उत्तरवाढोना येथील तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत झालेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्ता कमी जाडीचा असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. पुढे या समितीने नेर शहरातील नाबावपूर येथील एका आश्रम शाळेची पाहणी केली. यावेळी येथील आश्रम शाळेतील कर्मचारी यांची पदभरतीच रोस्टरनुसार नसल्याची धक्कादायक बाब समितीच्या लक्षात आली. येथील महिलांच्या सुविधेबाबत असलेली दयनीय अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुलांच्या आणि मुलींच्या इमारती अगदी लागून असल्याने मुलींच्या सुरक्षेवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मुलींच्या रूममधे लाईट, पंखा यासारख्या भौतिक सुविधा नसणे, शाळेतील कॉम्प्युटर रूमचे स्टोर रूम झाले असल्याचे समितीच्या लक्षात आले.

घरकुलाची पाहणी

माणिकवाडा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या एकूण २० घरकुलाची बारकाईने पाहणी समितीने केली. या दरम्यान त्या शाखा अभियंता आणि ठेकेदाराच्या निष्कृष्ठ कामाचे वाभाडे काढले. यावेळी समितीने रस्ता खोदून पाहिला. तेव्हा त्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची जाडी केवळ एक ते दीड इंच दिसून आली. त्याबरोबरच तेथील घरकुलाच्या कामाची पाहणी केली. तेथे नवीन बांधकामाला गेलेले तडे, अनेक ठिकाणी गळती लागलेला स्लॅब, खिडक्यांना नसलेले तावदान, विद्युत पुरवठा नसणे, स्वयंपाकगृह नसणे, दाराच्या चौकटी हलक्या प्रतीच्या लावण्यात आल्याचे दिसले. बांधकामाच्या विटा निकृष्ट दर्जाच्या, शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था पाहत असताना शौचालयाचे दार अक्षरशः हातात आले. हे बघून समितीचे सदस्य अत्यंत संतप्त झाले. विशेष म्हणजे येथील २०१७ मधे सुरू केलेले समाज मंदिराचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने विधी मंडळ सदस्य अवाक् झाले.

कंत्राटदारावर होणार कारवाई

माणिकवाडा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे काम पाहताना समितीच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाच्या या कल्याणकारी योजनेचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला. म्हणून येथील पाहणी दरम्यान कामातील अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदार, शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करणार असल्याचे समिती सदस्यांनी सुचोवात केले. विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी असलेल्या शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे होत आहे की नाही? हे पाहण्यासाठी समितीचा हा दौरा असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - कुचाशेठचा बर्थडे, मग चर्चा तर होणारच न भाऊ ! नागपुरात चक्क कोंबड्याचा वाढदिवस साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.