ETV Bharat / state

यवतमाळमध्ये पुन्हा 15 मेपर्यंत लॉकडाऊन, कडक कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - कोरोना नियमांचं उल्लंघन

यवतमाळमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत 9 मेच्या सकाळी 7 वाजेपासून ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहेत. यासदंर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश पारित केले आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

दुकानांवर होणार 50 हजार रुपयांचा दंड
दुकानांवर होणार 50 हजार रुपयांचा दंड
author img

By

Published : May 8, 2021, 10:25 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत 9 मेच्या सकाळी 7पासून ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. यासदंर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास, 50 हजार रुपयांचा दंड

अत्यावश्यक दुकानांना सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगी
कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहील. सर्व किराणा दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी खाद्यपदार्थांची दुकाने (ज्यात चिकन, मटन, मच्छी, अंड्यांची दुकाने) सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू राहील. आठवडी बाजार, पारंपरिक भाजीबाजाराची दुकाने, रस्त्यावर थांबून भाजीपाला व फळे विक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तथापी सोसायटी, कॉलनी व गल्लीमध्ये जाऊन भाजीपाला व फळे विक्री करण्यास सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत मुभा राहील.

कार्यालय प्रमुखावरही दंडात्मक कारवाई
सर्व खासगी, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेची कार्यालये (महसूल, आरोग्य, नगर परिषद, नगर पंचायत, विद्युत, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत) सुरू राहतील. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना बंदी राहील. कार्यालयात अभ्यागत आढळून आल्यास त्याच्यावर स्थानिक प्रशासनाकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल व संबंधित कार्यालय प्रमुखावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या, तक्रारी, निवेदने ई-मेल, व्हॉट्सॲप, दूरध्वनीने घेण्याचे नियोजन करावे. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच अशा लोकांची पथकाकडून कोविड चाचणी करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तिची रवानगी सीसीसीमध्ये करण्यात येईल व त्यासाठीचा येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे.

हेही वाचा - देशातील ऑक्सिजनच्या वितरणाकरिता नॅशनल टास्क फोर्स नेमा- केंद्राला 'सर्वोच्च' आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.