यवतमाळ - शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती अवधूत वाडी पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दर्शन दिकोंडवार घटनास्थळी दाखल झाले.
यवतमाळ : रुग्ण मृत पावल्याने खासगी शाह रुग्णालयामध्ये नातेवाईकांकडून तोडफोड - यवतमाळ कोरोना घडामोडी
शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती अवधूत वाडी पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दर्शन दिकोंडवार घटनास्थळी दाखल झाले.
यवतमाळ
यवतमाळ - शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती अवधूत वाडी पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दर्शन दिकोंडवार घटनास्थळी दाखल झाले.
कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कविता धनराज चव्हाण ह्या कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असून ऑक्सिजन लावण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे रागाच्या भरात या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी रुग्णालय प्रशासन वा मृत रुग्णाच्या नातेवाईक यांच्यावर अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.