यवतमाळ - कोरोनाच्या संकटात आता अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होत असून शेतकऱ्यांसह इतर नागरिकांवरही संकट ओढावले आहे.
दिवसभारपासून ढगाळी वातावरणाचे अवकाळी पावसात रुपांतर झाले असून सांयकाळी 5 च्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तत्पूर्वी दुपारच्या सुमारासही काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती.
अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. आधीच जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे नागरिक, शेतकरी चिंतेत आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि दमट वातावरणामुळे आबालवृद्ध आजारी पडत आहेत.
या बदलत्या वातावरणामुळे सध्या शेतकरी चिंतेत असून वादळी वाऱ्यामुळे काढणीवर आलेला गहू पूर्णतः आडवा झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर शेतातील चना पावसामुळे ओला झाला आहे.