ETV Bharat / state

यवतमाळ : ऑटो-ट्रकच्या अपघातात दोन ठार; सहा गंभीर जखमी - यवतमाळ अपघात बातमी

येळाबारा रोडवरील कान्होबा डेकडीच्या जवळ ट्रकने ऑटोला जोरधार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर सहा प्रवासीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

yavatmal latest news
यवतमाळ : ऑटो-ट्रकच्या अपघातात दोन ठार; सहा गंभीर जखमी
author img

By

Published : May 18, 2021, 6:37 PM IST

Updated : May 18, 2021, 7:12 PM IST

यवतमाळ - घाटंजी शहराला लागूनच असलेल्या येळाबारा रोडवरील कान्होबा डेकडीच्या जवळ ट्रकने ऑटोला जोरधार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. सुरेखा मोतीराम मेश्राम (35) आणि रुपा सचिन कुमरे(30) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सहा प्रवासीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

रिपोर्ट

वीटभट्टीवर जात होते मजूर -

मारेगाव येथील 6 मजूर विटभट्टीवर कामासाठी आटोने कामासाठी जात असताना यवतमाळमार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आटोला जोरदार धडक दिली. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा मजूर जखमी झाल्याने त्यांना घाटंजी ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच ट्रकला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा - बीकेसी कोविड सेंटरचे वादळामुळे कोणतेही नुकसान नाही उगाच राजकरण करू नका - महापौर

Last Updated : May 18, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.