यवतमाळ - पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करणार्या एका चोरट्यास अटक केली. या चोराकडून दीड लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विष्णू उर्फ बादल देवकर (रा. जांब) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. ही कारवाई यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील डिबी पथकाने केली.
हेही वाचा - यवतमाळमध्ये दोन तरुणांवर टोळक्याचा सशस्त्र हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर
याबाबत प्रशांत राऊत (34, रा. दांडेकर ले-आउट) या तरुणाने दुचाकी चोरीला गेल्याची पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून तपास सुरू असताना पोलीस रेकॉर्डवरील चोरट्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध या चोरट्याला ताब्यात घेतले. त्यावेळी या चोरट्याने 3 दुचाकी जोडमोहा व पोटगव्हाण येथील गॅरेज मालकाला विक्री केल्याची कबुली दिली.
हेही वाचा - अल्वपयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराला 'राम'नगर सुद्धा अपवाद नाही
दरम्यान, या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, सुरेश मेश्राम, सलमान शेख, सतीश चौधरी, ऋतुराज मेडवे, चक्षुराज इंगोले, सुधीर पुसदकर, सागर चिरडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबतचा पुढील तपास विजय मानकर व बबलू चव्हाण करत आहेत.