ETV Bharat / state

रिक्षा-दुचाकीमध्ये अपघात; दोन जागीच ठार, मारेगाव तालुक्यातील घटना - in moregaon yawatmal

यवतमाळातील मोरगाव येथे झालेल्या ऑटो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते. त्यांनी लगेच सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघातातील जखमींना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
author img

By

Published : Aug 30, 2019, 5:42 PM IST

यवतमाळ - येथील मारेगावपासून दोन किमी अंतरावर ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वारासह दोन जण जागीच ठार झाले. तर ऑटोतील सहा जण जखमी झाले आहेत. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघातातील जखमींना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रिक्षा क्र. (MH.२९ M. ५२८४) बोटोणीकडून मारेगावकडे प्रवासी घेऊन येत होता. मारेगाव येथील विनायक कोटेक्स जिनिंगजवळ ऑटोच्या समोर गाय आली. त्याच वेळी मारेगाव वरून दुचाकी क्र. (MH.२९ K ३४२८) बोटोणीकडे जात होती. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटोने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचालक व मागे बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली. तर ऑटोमधील चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहे.

मृतांमध्ये तुळसीराम भिमा टेकाम (वय - ४५), संतोष नारायण मडावी (वय- ३८ दोघेही रा. आवळगाव) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ऑटोचालक अतुल रामदास मेश्राम (३९), मारोती शिंदे (४०), सुनिल भिमा तोटे (३०), नीळकंठ टेकाम (३०), सुधाकर सूर्यभान वाघाडे (३०), सुनिल बबन वखनोर (३०) सर्व रा. बोटोणी यांचा समावेश आहे.

घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते. त्यांनी लगेच सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे.

Intro:Body:ऑटो दुचकिमध्ये अपघातात दोन ठार
मारेगाव तालुक्यातील घटना

यवतमाळ: मारेगाव शहरापासुन दोन किमी अंतरावर पोळ्याचा दिवशी ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार सह एकजण जागीच ठार झाले. तर ऑटोतील सहा जण जखमी आहे. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बोटोणी कडून मारेगाव कडे ऑटो (MH 29, M.5284) प्रवासी घेऊन येत होता. मारेगाव जवळ विनायक कोटेक्स जिनिंग जवळ ऑटोच्या समोर मोकाट गाय आली. त्याच वेळी मारेगाव वरून दुचाकी (MH29 K 3428) बोटोणीकडे जात होती. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटोने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचालक व मागे बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली. तर ऑटो मधील चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहे.
मृतकामध्ये तुळसीराम भिमा टेकाम (४५, रा. आवळगाव), संतोष नारायण मडावी (३८, आवळगाव) यांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये अॅटोचालक अतुल रामदास मेश्राम (३९) बोटोणी, मारोती शिंदे (४०) बोटोणी, सुनिल भिमा तोटे (३०) बोटोणी, नीळकंठ टेकाम (३०) शिवनाळा, सुधाकर सूर्यभान वाघाडे (३०), बोटोणी, सुनिल बबन वखनोर (३०) बोटोणी यांचा समावेश आहे. घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते त्यांनी लगेच सरका-यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्नालयात आणले. तर जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.