यवतमाळ - दिवा लावताना लागलेल्या आगीत दोन दुकानांची राखरांगोळी झाल्याची घटना घडली. ही घटना जिल्ह्यातील नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे घडली. या आगीत सायकल पंक्चरचे दुकान आणि पानटपरी जाळून खाक झाली.
हेही वाचा - यवतमाळ : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
दुकानदारांना दुहेरी फटका
ज्यावर रोजीरोटी आहे, तीच दुकाने जळून खाक झाल्याने या गरिबांचे संसार उघड्यावर आले असून त्यांच्यासमोर जीवन कसे जगावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. नागरिकांनी या आगीवर नियंत्रण मिळविले तो पर्यंत संपूर्ण दुकानातली सामान जळून खाक झाले होते. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले असताना संपूर्ण दुकाने जळून खाक झाल्याने दुकानदारांना दुहेरी फटका बसला आहे. सर्वसाधारण दुकानदारांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुकुटबन वन परिक्षेत्रात वाघाची शिकार; दोन पंजे नेले कापून