यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 2 जणांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 78 वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 33 जणांना सुट्टी देण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.
यवतमाळात 33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी, तर दोन नवीन बाधित रुग्णांची नोंद आयसोलेशन वॉर्डात गेल्या 24 तासात एक जण भरती झाला असून सद्यस्थितीत भरती रुग्णांची संख्या 282 आहे. यापैकी 204 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. आज तपासणीकरीता सात नमुने पाठविण्यात आले. आतापर्यंत सुरुवातीपासून एकूण 1155 नमुने तपासणीकरीता पाठविले आहे. यापैकी 1140 अहवाल प्राप्त आहे तर 15 नमुन्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. प्राप्त नमुन्यांपैकी 1052 नमुने निगेटिव्ह आले आहे. गेल्या 24 तासात 15 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी दोन नमुने पॉझिटिव्ह, 10 निगेटिव्ह आणि तीन नमुने निश्चित सांगता येत नसल्याने त्यांना तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 201 तर गृह विलगीकरणात एकूण 880 जण आहेत.
यवतमाळात 33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी, तर दोन नवीन बाधित रुग्णांची नोंद दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढणे, ही आरोग्य विभाग आणि प्रशासनाची चिंता वाढवणारी बाब आहे.