यवतमाळ - क्वारंटाईन करण्यात आलेल्या दोघांचे नमूने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला नुकताच प्राप्त झाला आहे. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. संबंधितांवर उपचार सुरू असून आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे. त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दहा होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. यातील 18 एप्रिलला चौघांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यामुळे संख्येत घट झाली होती. मात्र, रुग्णांच्या संपर्कात आल्याने काहीजणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे.